नुपूर पाटील, प्रतिनिधी मुंबई, 14 मार्च : मराठी नववर्षाचा दिवस असलेला गुढी पाडवा आता काही दिवसांवर आला आहे. वर्षाच्या पहिल्या दिवसाचं स्वागत घरामध्ये गुढी उभारुन करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. त्याचबरोबर या दिवशी नवीन ड्रेस घालण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. गुढीपाडव्याचं स्वागत करण्यासाठी मुंबईतील बाजारपेठ सज्ज झालीय. या पाडव्याला एखादा नवीन प्रकारचा ड्रेस तुम्ही शोधत असताल तर तुमचा शोध इथं संपेल. कसा आहे हा ड्रेस? मुंबईतील दादर मार्केटमध्ये दरवर्षी पाडव्या निमित्त नवा ट्रेंड पाहयला मिळतो. यावर्षी देखील पाडव्यासाठी खास ड्रेस या बाजारात दाखल झाले आहेत. यावर्षी पैठणी ड्रेसला विशेष मागणी आहे. ओढणी, पायजमा, कुर्ती असा थ्री पीस सेट असतो. ओढणीवर सुंदर मुनिया किंवा पोपट, मोर, फुलं,पान अशी वेगवेगळी नक्षी जरीने केलेली असते. त्याचपद्धतीची नक्षी पायजमावर असते. कुर्ती स्लिव लेस मिळते. त्यासोबत स्लीवज मिळतात. तसेच कुर्तीवर सुद्धा सुंदर जरी वर्क केलेलं मिळतं. काय आहे किंमत? 1000 रुपयांच्या आत सुंदर पैठणी ड्रेस मिळतात. सिल्वर जरी, गोल्डन जरी असे प्रकार यामध्ये उपलब्ध आहेत. नक्षी कामामध्ये कॉन्ट्रस्ट रंग वापरलेले असतात त्यामुळे ड्रेस अधिक उठावदार दिसतो. गुढीपाडव्याला मुलीसाठी करा मस्त खरेदी, मुंबईच्या मार्केटमधील पाहा नवी फॅशन, Video दादर मार्केटमध्ये या ड्रेसचे विविध प्रकार पाहायला मिळतात. यावर्षीच या प्रकारच्या ड्रेसची फॅशन चर्चेत असल्यामुळे या मार्केटमध्ये खास हे ड्रेस खरेदी करण्यासाठी ग्राहक येतात. मुंबईच्या विविध भागातून येथे लोकं नेहमीच कपडे खरेदीसाठी येतात. त्यामुळे हा नवा ट्रेंड ग्राहकांना चांगलाच आकर्षित करत आहे.
पैठणीच्या साड्यांना बेस्ट ऑप्शन म्हणून पैठणी ड्रेस तयार करण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे ड्रेस चांगले विक्री होत असल्याची माहिती दुकानातील कर्मचारी शोभा वैद्य यांनी दिली. पैठणी ड्रेस तयार करताना पैठणी साडीच्याच कपडापासून तयार केले जातात. आतून कॉटनचे अस्तर असल्यामुळे गरम होत नाही.
उन्हाळ्यात कॉटन कुर्ती हवीच! ‘इथं’ करा मुंबईतील सर्वात स्वस्त खरेदी! Video
कुठे मिळतील ड्रेस? भगवान कटपीस सेंटर, रानडे रोड येथे हे ड्रेस उपलब्ध आहेत. संपर्क -9867207299