मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Gudi Padwa 2023 : पाडव्याला तुमचं मुल दिसेल सुंदर, सेलिब्रेटींची पसंती असलेल्या दुकानात करा मस्त खरेदी! Video

Gudi Padwa 2023 : पाडव्याला तुमचं मुल दिसेल सुंदर, सेलिब्रेटींची पसंती असलेल्या दुकानात करा मस्त खरेदी! Video

X
Gudi

Gudi Padwa 2023 : लहान मुलांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह असतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या मुलाला ड्रेस घेण्याचा विचार करत असाल तर इथं अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

Gudi Padwa 2023 : लहान मुलांमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह असतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी तुमच्या मुलाला ड्रेस घेण्याचा विचार करत असाल तर इथं अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    नुपूर पाटील, प्रतिनिधी

    मुंबई, 21 मार्च :  लहान मुलांना गुढीपाडव्याचा मोठा उत्साह असतो. वर्षाचा पहिला दिवस झोकात साजरा करण्यासाठी मुलांना नवे कपडे अनेक जण खरेदी करतात. पाडव्यासाठी मराठमोळ्या थीमचे कपडे तुम्ही शोधत असाल तर तुम्हाला एक खास जागा आम्ही सांगणार आहोत. मुंबईतील दादरमधील एका दुकानात गुढीपाडव्यासाठी लहान मुलांचे कपडे उपलब्ध आहेत. मग गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अजून छान होण्यासाठी खालील दुकान कुठे आहे हे नक्की वाचा.

    कोणत्या प्रकारचे कपडे उपलब्ध?

    मुलांसाठी धोतर, बंडी, पायजमा, सदरा, पैठणी कोटी, खणाच्या कपडातले विविध प्रकारचे कपडे येथे मिळतात. तर, मुलींसाठी  पैठणी फ्रॉक, खणाचे फ्रॉक, इरकल फ्रॉक, पोलका - स्कर्ट, पैठणी कपडातले ड्रेस, नऊवारी साडी असे विविध प्रकार या लहानश्या दुकानात उपलब्ध आहेत. अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळापासून ते 10 वर्षांच्या चिमुकल्यापर्यंत हे कपडे येथे खरेदी करता येतात. आई आणि बाळ यांच्यासाठी मॅचिंग कपडेही इथं मिळतात.

    गुढीपाडव्याला हवाय इतरांपेक्षा वेगळा ड्रेस? 'इथं' संपेल तुमचा शोध,Video

    सेलिब्रिटीचींही पसंती

    दादरमधील या दुकानातील कपडे हे सेलिब्रिटी मुलांचीही पसंती आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परी उर्फ मायरा देखील इथंच कपडे खरेदीसाठी येते. मायरानं जन्मल्यापासून आजवर अनेक फ्रॉक आणि इतर ड्रेस इथंच खरेदी केले आहेत. एखादा सण किंवा उत्सव असला तर तिचे कपडे इथेच डिझाईन होतात, अशी माहिती येथील दुकानदारानं दिली.

    काय आहे किंमत?

    या दुकानातले कपडे ओरिजिनल येवला पैठणी कापडापासून तयार केले जातात. त्याचबरोबर खण, इरकलचे कापड, मऊ कापड वापरले जाते. त्यामुळे लहान मुलांना कपड्याचं इन्फेक्शन होत नये, असं दुकानदारानं सांगितलं. या कपड्यांची किंमत 350 ते 2500 रुपयांच्या दरम्यान आहे. लहान गोंडस चिमुकल्यांसाठी सुंदर, टिकाऊ आणि आकर्षक कपडे इथं मिळतात.

    कुठे आहे दुकान?

    स्वीट बेबी शॉप, रानडे रोड, पोस्ट ऑफिस जवळ, दादर पश्चिम

    संपर्कासाठी क्रमांक :  +919082781363

    First published:
    top videos

      Tags: Gudi Padwa 2023, Lifestyle, Local18, Mumbai, Shopping