जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्याचा नादखुळा! वीज तोडायला आलेल्या महावितरण अधिकाऱ्याला इंग्रजीतून विचारला जाब, Video Viral

शेतकऱ्याचा नादखुळा! वीज तोडायला आलेल्या महावितरण अधिकाऱ्याला इंग्रजीतून विचारला जाब, Video Viral

शेतकऱ्याचा नादखुळा! वीज तोडायला आलेल्या महावितरण अधिकाऱ्याला इंग्रजीतून विचारला जाब, Video Viral

Sangli Farmer English : महावितरणाचे पथक सांगली जिल्ह्यातील शेतामध्ये गेले होते. त्यावेळी वयोवृद्ध शेतकऱ्यांनं त्यांना इंग्रजीमध्ये जाब विचारला.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

    स्वप्नील एरंडोलीकर, प्रतिनिधी सांगली, 8 फेब्रुवारी :  शेतकऱ्यांची वीज चोरी पकडून त्यावर योग्य कारवाई करण्यासाठी महावितरणाच्या भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. महावितरणाचे पथक सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात गेले होते. त्यावेळी एका वयस्कर शेतकऱ्यानं इंग्रजीतून आपली कैफियत मांडली. अधिकारी आणि वयोवृद्ध शेतकरी यांच्यातील संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे प्रकरण? सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामध्ये महावितरण विभागाने वीज चोरी रोखण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून शेती पंपासाठी होत असणारी वीजचोरी पकडण्यासाठी हे अधिकारी या शेतावर दाखल झाले होते. आटपाडी तालुक्यातील यमाजी पाटलाच्या वाडीतील शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना अनपेक्षितपणे विरोधाचा सामना करावा लागला. गुलाब उत्पादकांची ‘खुलली कळी’, Valentine Week मध्ये आले अच्छे दिन, Video महावितरणाच्या पथकातील सहाय्यक अभियंता सुनील पवार यांच्याशी शेतकरी वेताळ चव्हाण यांनी इंग्रजीमधून संवाद साधला. त्यांच्या विहिरीवरील विद्युत पंपासाठी आकडा टाकून वीज घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले होते. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या सर्व आक्षेपांना फर्ड्या इंग्रजीतून उत्तर दिले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

    जाहिरात

    शेतकरी चव्हाण आणि अधिकाऱ्यामध्ये झालेलं हे संभाषण पथकातील कर्मचाऱ्यांनी चित्रित केलं असून त्याची सध्या सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात