मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला सांगलीतील शिराळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट, 11 जुलैला सांगलीतील शिराळा कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे.

सांगली, 9 जून : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNC Chief Raj Thackeray) यांच्या विरुद्ध वॉरंट हुकूम बजावूनही ते हजर न राहिल्याने शिराळा न्यायालयाने (Shirala court) बुधवारी त्यांना पुन्हा अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जुलै 2022 रोजी होणार आहे. तसेच मनसे नेते शिरीष पारकर (Shirish Parkar) यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द करण्यात आला आहे.

शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शिरीष पारकर या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश बजावला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. राज ठाकरे हे वॉरेंट हुकूम देऊन देखील न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा वॉरंट बजावले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शिरीष पारकर यांच्यासह दहा जणांवर बेकायदेशीर जनसमुदाय गोळा करणे, शांततेचा भंग करणे, चुकीच्या मार्गाने हुसकावणे, घोषणाबाजी करणे अशा विविध कलमाखाली तसेच खटल्याच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल त्यांच्यावर शिराळा न्यायालयात खटला दाखल आहे.

वाचा : MLC Election : राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारांची नावे जाहीर

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2008 ला रेल्वेमध्ये मराठी तरुणांना नोकरीची संधी मिळावी म्हणून मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले होते. याबद्दल कल्याण न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता . त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रभर मनसेने आंदोलन करून अनेक ठिकाणी बंद पुकारलं होता. यावेळी तालुका मनसेकडून तानाजी सावंत यांनी शेडगेवाडी येथे बंद पुकारून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्यास भाग पाडले म्हणून सावंत यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल झाले होते.

सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे.

First published:

Tags: MNS, Raj Thackeray, Sangli