Home /News /mumbai /

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाचं वॉरंट, अटक होणार?

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात शिराळा कोर्टाचं वॉरंट, अटक होणार?

MNS President Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने वातावरण तापले असतानाच आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे.

विनोद राठोड, प्रतिनिधी मुंबई, 3 मे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली असून भोंगे उतरविण्याच्या संदर्भात अल्टीमेटम सुद्धा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वातावरण तापलेलं असतानाच आता सांगलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सांगलीतील शिराळा कोर्टाने (Shirala Court) वॉरंट काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्या विरोधात शिराळा कोर्टाने वॉरंट काढलं आहे. हे वॉरंट 2012 मध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात असल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण 10 वर्षे जुनं आहे. 6 एप्रिल रोजी वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र, या संदर्भात अद्याप कुठलीच कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल कोर्टाने पोलिसांना विचारला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगली जिल्ह्यात मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांनी शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी जवळ आंदोलन करून दुकानांची तोडफोड केली होती. यानंतर याबाबतचा गुन्हा शिराळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनसे जिल्हाअध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासहित अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल आहे. या खटल्यामध्ये राज ठाकरे यापूर्वी एकदा न्यायालयात हजर देखील झाले होते. मात्र पुढील तारखांना गैरहजर राहिल्यामुळे कोर्टाने आता राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदीवरील भोंगे बंद नाही झाले तर मशिदींसमोर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) लावावी, असे आदेश कार्यकर्त्यांना केले. राज ठाकरेंनी दिलेल्या या अल्टीमेटम नंतर गृहविभागही अलर्ट झाले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतल्याने वातावरण चांगलेच तापले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे. त्यामुळेच मुंबई पोलिसांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' (Shivtirth) या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ केली आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: MNS, Raj Thackeray, Sangli

पुढील बातम्या