सांगली, 21 ऑक्टोबर : मागच्या दहा महिन्यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचा चिरंजीव रोहीत पाटील यांने कवटेमहांकाळ नगरपरिषदेत सत्ता काबीज केली होती. खासदार संजय काका पाटील यांना रोहीत पाटील यांनी चांगलाच दणका दिला होता. परंतु अवघ्या 10 महिन्यात संजय काका पाटील यांच्या गटाकडून रोहित पाटील गटाला धोबीपछाड दिल्याने कवठेमंकाळ नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे विजयी झाल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान दोन्ही गटातील उमेदवारांना समान मते पडल्याने चिट्टीद्वारे निवड करण्यात आली यामध्ये गावडे यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली.
हे ही वाचा : संभाजीराजे सरकारवर संतापले जयप्रभा स्टुडिओ संपवणाऱ्यांना पाठीशी घालू नका…
दहा महिन्यापूर्वी झालेल्या सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ नगरपंचायतीची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी बाजी मारली होती. तर भाजपचे खासदार संजय काका पाटील आणि शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे यांच्या गटाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. राष्ट्रवादी काँग्रेसने एकादी सत्ता मिळवली होती.
मात्र दहा महिन्याच्या आतच खासदार संजय काका पाटील यांनी कवठेमंकाळ नगरपंचायत मधील राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आणली आहे. राष्ट्रवादीचे चार नगरसेवक फुटल्यामुळे खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे या विजयी झाल्या आहेत. संजय काका गटाच्या सिंधुताई गावडे आणि रोहित पाटील गटाचे उमेदवार राहुल जगताप यांना प्रत्येकी आठ मत मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी चिट्टी वर मतदान घेतलं यामध्ये संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे ह्या विजयी झाल्या.
हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘घरात’ गँगवारचा भडका, ठाण्यात 2 तासात 2 गोळीबार
कवठेमंकाळ नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे बहुमत असून सुद्धा खासदार संजय काका पाटील गटाच्या सिंधुताई गावडे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना हा मोठा धक्का बसला आहे. चार नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप पराभूत झाले आहेत.

)







