जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजे सरकारवर संतापले जयप्रभा स्टुडिओ संपवणाऱ्यांना पाठीशी घालू नका...

Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजे सरकारवर संतापले जयप्रभा स्टुडिओ संपवणाऱ्यांना पाठीशी घालू नका...

Sambhajiraje Chatrapati : संभाजीराजे सरकारवर संतापले जयप्रभा स्टुडिओ संपवणाऱ्यांना पाठीशी घालू नका...

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, असे संभाजीराजे म्हणाले

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 21 ऑक्टोबर : कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ चित्रपटसृष्टीचा पाया रचला गेला. तोच जयप्रभा स्टुडीओ लाटण्याचा घाट घालणाऱ्यांविरोधात आज कोल्हापुरात आत्मदहन आंदोलन करण्यात आलं. जयप्रभा स्टुडीओ वाचवण्यासाठी आंदोलकांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न करताच पोलीस आणि आंदोलकांच्यामध्ये जोरदार झटापट झाली. मागच्या 250 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे परंतु यावर कोणतीही शासन निर्णय झाला नाही. यावर माजी खासदार स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला खरमरीत शब्दात पत्र लिहत लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती…

जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ वाचविण्यासाठी गेले अडीचशे दिवस आंदोलन सुरू असून आज आंदोलकांनी उग्र रूप धारण केले आहे. यावेळी काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करीत सरकारला या विषयात लक्ष घालून जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी केलेली आहे.

हे ही वाचा :  तक्रार करणाऱ्या महिलेला रावसाहेब दानवे म्हणाले ‘ये मावशी तुझ्या पाया पडू का?’, महिलेनं दिलं सडेतोड उत्तर

छत्रपती संभाजीराजे आपल्या ट्विट मध्ये म्हणतात,

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ कोल्हापूरात रोवली गेली. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी चित्रपट सृष्टीस उत्तेजन देण्यासाठी कोल्हापूर येथे स्टुडिओ सुरू केला. सध्या जयप्रभा स्टुडिओ या नावाने ओळखला जाणारा हा स्टुडिओ नंतरच्या काळात महाराजांनी हा स्टुडिओ केवळ चित्रपट निर्मितीसाठीच वापरायचा या अटीवर सुप्रसिध्द चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर यांच्याकडे सोपविला.

जाहिरात

बहुतांश नामांकित मराठी चित्रपटांचे शूटिंग हे याच स्टुडिओ मध्ये झालेले आहे. कित्येक हिंदी चित्रपट देखील याठिकाणी घडले. नंतर काही कारणांनी पेंढारकर यांनी देखील या स्टुडिओ वरील ताबा गमविला. कोल्हापूरच्या कलानगरीचा कणा असणारा हा ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओ अलिकडच्या काळात विकसकाच्या घशात घातला जात आहे. यामुळे या स्टुडिओचे अस्तित्व संपत चालले आहे.

हे ही वाचा :  दिवाळीपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, आयपीएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

जाहिरात

याविरोधात कोल्हापूरात गेले २५० दिवस कलाक्षेत्राशी निगडीत जनतेचे आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. राज्य सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालावे. जयप्रभा स्टुडिओ संपविण्याचा घाट घालणाऱ्या कुणालाही सरकारने पाठीशी न घालता स्थानिक कलाकारांची साद ऐकावी व जयप्रभा स्टुडिओला गतवैभव मिळवून द्यावे असे ते म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात