Home /News /maharashtra /

सांगलीत कोरोनावरून राडा! रॅपिड अँटिजेन टेस्टला विरोध, नागरिकांकडून कंटेन्मेंट झोनमध्ये तोडफोड

सांगलीत कोरोनावरून राडा! रॅपिड अँटिजेन टेस्टला विरोध, नागरिकांकडून कंटेन्मेंट झोनमध्ये तोडफोड

पोलिसांसमोरच परिसरातील कंटेन्मेंट झोनची तोडमोड करण्यात आली. बॅरिगेट्स तोडून टाकले, पत्रे उचकटून मोठ्या प्रमाणात झोनची तोडमोड केली आहे.

सांगली, 25 जुलै: शहरातील इंदिरा नगरमध्ये रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे. शुक्रवारी 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने हा संपूर्ण परिसर महानगर पालिकेकडून सील करण्यात आला आहे. मात्र, रॅपिड अँटिजेन टेस्टला या परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. संतप्त नागरिकांनी शनिवारी कंटेन्मेंट झोनमध्ये राडा केला. हेही वाचा...कोरोनाचा उद्रेक! कोरोनामुक्त झालेल्या मनमाडची पुन्हा 'हॉटस्पॉट'कडे वाटचाल पोलिसांसमोरच परिसरातील कंटेन्मेंट झोनची तोडमोड करण्यात आली. बॅरिगेट्स तोडून टाकले, पत्रे उचकटून मोठ्या प्रमाणात झोनची तोडमोड केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच वैद्यकीय तपासणीला इंदिरा नगर परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्यानं होत असल्यानं महानगरपालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्य रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये इंदिरा नगरमध्ये सापडले 23 पॉझिटिव्ह सापडले होते. या पार्श्वभूमीवर संपूर्ण इंदिरा नगर हे कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार या परिसरात तातडीने औषध फवारनीसह वैद्यकीय सर्व्हे वाढण्यात आला आहे. याचबरोबर उपायुक्त स्मृती पाटील, सहायक आयुक्त एस एस खरात, स्वच्छता निरीक्षक बंडा जोशी, याकूब मद्रासी , अतुल आठवले यांच्या टीमकडून तातडीच्या उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे यांच्या वैद्यकीय पथकाकडून नागरिकांची रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेणेचे काम सुरू असून कंटेन्मेंटच्या अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. हेही वाचा...चिकण बिर्याणीवरून वाद! डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची केली निर्घृण हत्या कोरोनाचा कहर... सांगली महानगरपालिका क्षेत्रात रॅपिड अँटिजेंन टेस्ट घेण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह व्यक्ती सापडत आहेत. सांगलीच्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये 23 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे हा संपूर्ण इंदिरानगर केले जाणार परिसरच कंटेन्मेंट झोन केला जात असून या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना याचा ठिकाणी क्वारंटाइन केले जाणार आहे. अजूनही या परिसरात रॅपिड अँटिजेंन टेस्ट सुरू असून महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना सुरवात केली आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Coronavirus, Sangli news

पुढील बातम्या