Home /News /pune /

चिकण बिर्याणी खाण्यावरून वाद! डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची केली निर्घृण हत्या

चिकण बिर्याणी खाण्यावरून वाद! डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची केली निर्घृण हत्या

चिकण बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणानेच आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

पिंपरी चिंचवड, 25 जुलै: चिकण बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणानेच आपल्या मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. विनोद मधुकर शिंदे (वय- 32 रा. भोसरी) असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं तर मनोहर शिवाजी कांबळे (वय- 35 रा. पिंपरी) असं आरोपीचं नाव आहे. हेही वाचा...पुण्यात ससून रुग्णालय परिसरात धक्कादायक प्रकार, महिला डॉक्टरने समोर आणली घटना दोघे ही भंगार गोळा करून उदरनिर्वाह भागवायचे दरम्यान, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी हा टक्कल आणि दाढी वाढवून शहरात फिरत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 जुलै रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपोमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. संबंधित तरुण हा मिसिंग आहे का, अशा आशयाचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्यात आला. मयत व्यक्तींची ओळख पटते का याचा प्रयत्न केला. मात्र, याचा पोलिसांना काहीच फायदा झाला नाही. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दौंडकर, पोटे यांनी मृत्यू झालेल्या विनोद यांच्या नातेवाईकांचा शोध लावला. 9 जुलै रोजी मयत विनोद हा मनोहर याच्या सोबत घराबाहेर पडल्याचे समजले. तपासाची चक्रे फिरवताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि खुनाची उकल झाली. खुनाच्या काही दिवस अगोदर एकाने उरलेली चिकन बिर्याणी विनोद आणि आरोपी मनोहरला खायला दिली होती. यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. विनोदने आरोपीच्या खांद्याला कडाडून चावा घेतला होता. त्याचाच राग मनोहरच्या मनात होता. हेही वाचा...हॉस्पिटलमध्ये झाला बाळाचा मृत्यू, बापाने केले आंदोलन की, लोकांचे डोळे पाणावले भंगार गोळा करत असताना विनोद हा मोठ्या कचरा कुंडीत उतरला. त्याच वेळी आरोपी मनोहरने वरून डोक्यात दगड घातला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. तिथून आरोपी मनोहरने पोबारा केला होता. कचरा उलण्यात आला तेव्हा तो मृतदेह तसाच मुख्य कचरा डेपो मोशी येथे गेला आणि घटना समोर आली होती.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pimpari chinchvad, Pune crime, Pune news, Pune police

पुढील बातम्या