Home /News /maharashtra /

कोरोनाचा उद्रेक! कोरोनामुक्त झालेल्या मनमाडची पुन्हा 'हॉटस्पॉट'कडे वाटचाल

कोरोनाचा उद्रेक! कोरोनामुक्त झालेल्या मनमाडची पुन्हा 'हॉटस्पॉट'कडे वाटचाल

एकीकडे हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना दुसरीकडे मालेगावला खेटून असलेल्या मनमाड शहरात कोरोनानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

मनमाड, 25 जुलै: एकीकडे हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचला असताना दुसरीकडे मालेगावला खेटून असलेल्या मनमाड शहरात कोरोनानं पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. येथे रोज कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने मनमाड शहर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरतोय की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. हेही वाचा...चिकण बिर्याणीवरून वाद! डोक्यात दगड घालून मित्रानेच मित्राची केली निर्घृण हत्या मनमाड शहर 26 जून रोजी कोरोनामुक्त झालं होतं. मात्र त्यानंतर शहरातील अनेक नागरिक लग्न समारंभ, अंत्यविधी, दहावे यासह इतर कार्यक्रमाला गेले आणि येताना कोरोना आपल्यासोबत घेऊन आले. त्यामुळे शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला असल्याचं मत वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे यांनी व्यक्त केले कोरोनाबाधित रुग्णाची संख्या वाढत असल्यामुळे पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधीतर्फे वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहे, असा दावा सत्ताधारी शिवसेना गट नेते गणेश धात्रक यांनी केला आहे. तर पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी केला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करून सर्व नागरिकांची तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत डॉ.प्रवीण शिंगी यांनी व्यक्त केलं आहे. हेही वाचा...14 वर्ष केला देहाच्या व्यापार, आता हाती लागले हक्काचे काम; 'चिची हाऊस'ची कहाणी मनमाड शहर 26 जून रोजी कोरोनामुक्त झाल्यानंतर शहरात पुन्हा कोरोनाने उसळी घेतली आहे. टप्याटप्याने नवे रुग्ण आढळून येत असल्याने आता शहरात रुग्णांची संख्या जवळपास 187 वर पोहोचली आहे. 101 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे कडक उपाययोजना करण्याची गरज असून अन्यथा आगामी काळात मनमाड नवा हॉटस्पॉट होईल, असे म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या