जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सनातनचं निर्दोषत्व पुन्हा सिद्ध! भगवा दहशतवादाचं मिथक प्रचारित करणार्‍यांना सणसणीत चपराक'

'सनातनचं निर्दोषत्व पुन्हा सिद्ध! भगवा दहशतवादाचं मिथक प्रचारित करणार्‍यांना सणसणीत चपराक'

'सनातनचं निर्दोषत्व पुन्हा सिद्ध! भगवा दहशतवादाचं मिथक प्रचारित करणार्‍यांना सणसणीत चपराक'

गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शनिवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला

  • -MIN READ
  • Last Updated :

पणजी, 19 सप्टेंबर: गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शनिवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. यातील सर्व सहाही आरोपींची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली आहे. हे सहाही आरोपी सनातन संस्थेशी संबंधित होते. मडगाव येथे 16 ऑक्टोबर 2009 रोजी हा बॉम्बस्फोट झाला होता. गोवा उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर सनातन संस्थेनं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हेही वाचा… मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, गोवा हायकोर्टाचा निकाल गोवा उच्च न्यायालयाच्या निकालानं सनातनचं निर्दोषत्त्व पुन्हा एकदा सिद्ध झालं असून भगवा आतंकवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे, असं सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी म्हटलं आहे. चेतन राजहंस यांनी सांगितलं की, गोव्याती मडगाव स्फोट प्रकरणी सनातनच्या 6 निष्पाप साधकांना गोवण्याचा प्रयत्न गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाने केला होता. चार वर्षे अकारण कारावास भोगल्यानंतर सत्र न्यायालयानं सनातनच्या या सर्व साधकांना निर्दोष मुक्त केले होते. याविषयीच्या अपिलावर सुनावणी करतांना शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. आम्ही न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत करतो. या निकालामुळे सनातन संस्थेचे निर्दोषत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. भगवा आतंकवादाचे मिथक प्रचारित करणार्‍यांसाठी ही सणसणीत चपराक आहे, असंही चेतन राजहंस यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 11 वर्षांपूर्वी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगावमध्ये बॉम्बस्पोट झाला होता. यामध्ये सनातन संस्थेचे मलगोंडा पाटील आणि योगेश नाईक हे साधक मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणाचा तपास गोवा पोलिसांकडून राष्ट्रीय तपास एजन्सीकडे (NIA) सुपूर्द केला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने तपास करून एकूण 12 दावे न्यायालयात मांडले होते. यापैकी आठ दावे या यंत्रणेला सिद्ध करता आले नाहीत. त्यामुळे विनायक तळेकर, विनायक पाटील, धनंजय अष्टेकर, दिलीप माणगावकर, प्रशांत अष्टेकर आणि प्रशांत जुवेकर या आरोपींना दोषमुक्त करण्यात आले आहे. हे सर्व आरोपी सनातन संस्थेशी संबंधित आहेत. हेही वाचा… सत्तेचा मटका लागल्यानंतर ठाकरे सरकार डान्सबारही सुरू करणार का? भाजपचा सवाल चार आरोपी फरार… याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सनातन संस्थेशी संबंधित सारंग कुलकर्णी, जयप्रकाश आण्णा हेगडे, रुद्र पाटील आणि प्रवीण निमकर या अन्य चार आरोपींना फरार घोषित केलं आहे. दरम्यान, हे चौघे अद्याप फरार आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकात घडलेल्या अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि प्रोफेसर कलबुर्गी यांच्या हत्येशी ही संबंध जोडला जात आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआय त्यांचा तपास करत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात