• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • राहुल गांधींनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचा हवाला देत शिवसेनेकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

राहुल गांधींनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचा हवाला देत शिवसेनेकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल

वाढत्या महागाईवरुन शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचं कौतुक केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 03 सप्टेंबर: शिवसेनेनं (Shivsena) केंद्र सरकारवर (Central Government) पुन्हा एकदा टीका केली आहे. वाढत्या पेट्रोल,डिझेल, गॅस सिलिंडरच्या वाढत्या किंमतीवरुन शिवसेनेनं केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मात्र यावेळी त्यांनी काँग्रेस नेते (Congress) राहुल गांधी (Rahul Gandhi)यांचं कौतुक केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधत राहुल गांधींचं कौतुक करण्यात आलं आहे. वाढत्या महागाईवरुन संजय राऊतांनी केंद्र सरकारवर ताशोरे ओढले. मात्र यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचं कौतुकही केलं आहे. राहुल गांधी यांनीही केंद्र सरकारच्या घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली होती. राहुलचे अर्थशास्त्र या शीर्षकाखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. काय आहे आजच्या अग्रलेखात देशाच्या अर्थव्यवस्थेचे आज वसाहतीकरण झालं आहे. देश चालवण्यासाठी कोणतेही नेते काही ताम्रपट घेऊन आलेले नाहीत. पंडित नेहरुंचा अर्थविषयक विचार आज विकायला काढला आहे. उद्या दुसरे लोक राज्यावर येतील. ते लोक नव्या पिढीचे असतील. देशाची लुटमार थांबवून नवा देश, नव्या अर्थव्यवस्थेची घडी निर्माण करतील. महागाईचा वणवा पेटलाय. त्यात लोकांच्या संतापाची ठिणगी पडत राहिली तर भडका उडायला किती वेळ लागेल? राहुल गांधी यांची तेच अर्थशास्त्र समजावून सांगितलं आहे. देशाचे आर्थिक चित्र विदारक आहे व राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांत घसरलेल्या अर्थव्यवस्थेवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी महागाईसंदर्भात जी क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे सरकारची किल्लेबंदी ढासळून पडली आहे. Weather Update: उद्यापासून सलग तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस राहुल गांधी यांनी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीवर हल्ला चढवला आहे. जीडीपीतील वाढ म्हणजे विकास दरातील वाढ नव्हे, तर गॅस, डिझेल, पेट्रोलची दरवाढ (जीडीपी) आहे असे घाव श्री. गांधी यांनी घातले आहेत. सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे, पण आता या लुटमारीच्या विरोधात संपूर्ण देश एकत्र येत आहे. राहुल गांधी यांनी पुढे सांगितलं आहे की, सरकारनं गरीब- मध्यमवर्गीयांचे जगणेच नष्ट केले. यूपीएनं सरकार सोडले. 15 दिवसांच्या आत दुसरी सर्वपक्षीय बैठक, मराठा आरक्षणावर होणार चर्चा डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोलच्या किंमतीत भरमसाठ वाढ करुन मोदी सरकारनं 23 लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले. हे 23 लाख कोटी रुपये नक्की गेले कोठे, त्याचा हिशेब राहुल गांधी यांना मागितला आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: