Home /News /maharashtra /

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक; मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणावर होणार चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक (All party meeting) बोलावली आहे.

  मुंबई, 03 सप्टेंबर: राज्यातील मराठा (Maratha reservation) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी आज पुन्हा सर्वपक्षीय बैठक (All party meeting) बोलावली आहे. गेल्या आठवड्यातही आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. ही बैठक आज संध्याकाळी होणार आहे. गेल्या आठवड्यात 27 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात अनेक राजकीय पक्षांकडून मत मागवलं होतं.

  MPSC परीक्षेच्या उमेदवारांना शनिवारी लोकलने प्रवास करण्यास परवानगी; मात्र...

   मुख्यमंत्र्यांनी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीचे स्वागत केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या मागणीवर सर्व पक्षांनी एकजूट आणि एकमत राहिले पाहिजे.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Maratha reservation, Shiv sena, Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या