जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आबांच्या लेकाचा किदरवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती विजय; संजयकाका पाटलांना धक्का

आबांच्या लेकाचा किदरवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती विजय; संजयकाका पाटलांना धक्का

आबांच्या लेकाचा किदरवाडी ग्रामपंचायतीवर एकहाती विजय; संजयकाका पाटलांना धक्का

सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली. आज सकाळी तासगाव तहसीलदार कार्यालयावर ही मतमोजणी पार पडली.

  • -MIN READ Sangli,Maharashtra
  • Last Updated :

सांगली, 5 ऑगस्ट : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी विरोधकांना पुन्हा एकदा धोबीपछाड देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीनंतर आता पुन्हा आपली छाप पाडली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकहाती विजय - राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचे रोहित पाटील यांनी भाजपचे खासदार संजयकाका पाटील धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. रोहितपाटील यांच्या पॅनलच्या सर्व 7 च्या 7 सर्व उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपच्या पॅनलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झाले आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर सांगली राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाली. अशात त्यांचे पुत्र रोहित पाटील हे जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. त्यांनी कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीतही आपली छाप पाडली होती. यानंतर आता किदरवाडी ग्रामपंचायतही राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. सांगली जिल्ह्यातील एकमेव किदरवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. आज सकाळी तासगाव तहसीलदार कार्यालयावर ही मतमोजणी पार पडली. निवडणुकीत एकूण मतदार संख्या 677 असून 378 जणांनी मतदान केले होते. 3 प्रभागांमध्ये 7 जागा साठी 14 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. तर निवडणुकीसाठी 55 टक्के मतदान झाले होते. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पाटील यांच्या पॅनल विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनलमध्ये थेट लढत होती. त्यामुळे याठिकाणी दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात रोहित पाटील यांनी यांच्या पॅनलने बाजी मारली. हेही वाचा -  ‘राणे, शिंदे आणि निलंबन…’ भाजप-शिवसेना पुन्हा एकत्र येणं का फिस्कटलं? केसरकरांनी सांगितली Inside Story याआधी रोहित पाटील यांच्या नेतृत्त्वात कवठेमहांकाळ नगरपरिषदेत दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर आता भाजपचे खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा एकदा धक्का देत किदरवाडी ग्रामपंचायतीवर रोहित यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे. यामुळे आर. आर. पाटील यांचे चिरंजीव राजकारणात सेट होत आहेत, अशी चर्चा होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात