Home /News /national /

कोरोनावर औषधाचा दावा करणाऱ्या बाबा रामदेवांना दणका, डॉक्टराने गाठले पोलीस स्टेशन!

कोरोनावर औषधाचा दावा करणाऱ्या बाबा रामदेवांना दणका, डॉक्टराने गाठले पोलीस स्टेशन!

केंद्र सरकारनेही पतंजलीला दणका देत आधी सविस्तर माहिती द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश दिले.

जयपूर, 24 जून : कोरोनाबाधित रुग्ण अवघ्या 3 दिवसांमध्ये बरा होणार असा दावा बाबा रामदेव आणि पतंजली रिसर्च सेंटरकडून करण्यात आला होता. परंतु, आता बाबा रामदेव यांच्या या दाव्याविरोधात जयपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबा रामदेव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कोरोनिल औषधाची घोषणा केली. पण, बाबा रामदेव यांनी केलेला दावा हा दिशाभूल करणार आहे, असं म्हणत जयपूरमधील गांधी नगर पोलीस ठाण्यात बाबा रामदेव यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. जयपूरचे डॉक्टर संजीव गुप्ता यांनी ही तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या औषधाचा दावा करून बाबा रामदेव यांनी त्यांची दिशाभूल केली असा गुप्ता यांनी तक्रारीत आरोप केला आहे. तसंच, आयसीएमआरच्या परवानगीशिवाय औषध कसे सुरू करण्यात आले? असा सवालही उपस्थितीत करण्यात आला. धक्कादायक! बंगळुरुतील IAS अधिकाऱ्याची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास दरम्यान,  कोरोनिल (Coronil) या औषधामुळे कोरोना 100% बरा होतो असा दावा पतंजलीने केला होता. यानंतर केंद्र सरकारने पतंजलीला दणका दिला होता. आपल्याला या औषधाबाबत काहीही माहिती नाही. आधी सविस्तर माहिती द्यावी, तोपर्यंत जाहिरात थांबवा, असे आदेश दिले. तसंच आयुष मंत्रालयाने या औषधाची माहिती, त्याचं क्लिनिकल चाचणी कुठे करण्यात आली, त्याला मान्यता कुणी दिली आणि त्याचा परिणाम काय आला, याबाबत सविस्तर माहिती अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश दिले. तसंच उत्तराखंड राज्याच्या संबंधित परवाना प्राधिकरणालाही या उत्पादनाला परवानगी दिल्याच्या तपशील सादर करण्यास सांगितलं होतं. लॉकडाऊनमुळे गमावली शिक्षकाची नोकरी; उदरनिर्वाहासाठी आता डोसा विकण्याची वेळ केंद्राने दणका दिल्यानंतर आचार्य बालकृष्ण यांनी खुलासा केला.  'हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं सरकार आहे. जो कम्युनिकेशन गॅप होता तो दूर झाला आहे. औषधाच्या ट्रायलचे स्टँडर्ड पॅरामिटर्स असतात, ते 100 टक्के पूर्ण केलेत. याची माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे' असा खुलासा आचार्य बालकृष्ण यांनी केला. संपादन - सचिन साळवे
First published:

पुढील बातम्या