जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक

Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक

Rekha Jare Murder Case: रेखा जरे हत्याकांड प्रकरणात मोठी घडामोड! मुख्य सूत्रधार बाळ बोठेला अटक

Rekha Jare Murder Case: रेखा जरे प्रकरणातील ही एक मोठी घडामोड आहे कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता.

  • -MIN READ
  • Last Updated :

    अहमदनगर, 12 मार्च: रेखा जरे हत्याकांडात (Rekha Jare Murder Case) हैदराबादमधून मोठी घडामोड समोर येते आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील (Rekha Jare Murder News) मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला अखेर अटक करण्यात आली आहे. अहमदनगर पोलिसांनी हैदराबादमधून ही अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रेखा जरे प्रकरणातील ही एक मोठी घडामोड आहे कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता. साडेतीन महिन्यासाठी त्याला पोलिसांना गुंगारा देण्यास यश आलं, मात्र पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोन मारेकऱ्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. मात्र हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे फरार होता. विविध पोलीस पथके त्याचा शोध घेत होते. अखेरीस त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली आहे (हे वाचा- मोठी बातमी! अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझेंचा अर्ज, या तारखेला ठरणार भवितव्य ) .पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. यासंबंधी पाटील स्वत: प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती देणार आहेत. साडेतीन महिन्यापासून फरार असणारा बोठे अखेर पोलिसांना कसा सापडला याबाबत सविस्तर माहिती पाटील देतील. पोलिसांना तो हैदराबादमध्ये असल्याची टीप मिळाली होती, त्यानुसार छापा टाकत त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधिक्षक पाटील आणि तपास अधिकारी अजित पाटील यांनी या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 5 विशेष पथकं नेमली होती. या पथकांनी हैदराबादमध्ये पोहोचून धडक कारवाई केली. काय आहे प्रकरण? 30 नोव्हेबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात रेखा जरे यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी हल्ला केला होता. मोटरसायकल (क्रमांक एम एच 17-2380) वरून आलेल्या दोन अज्ञात 25 ते 30 वयोगटातील तरुणांनी गाडीला धक्का लागल्याचे कारणावरून रेखा जरे यांच्याशी वाद घातला होता. काही वेळाने या तरुणांनी धारदार शस्त्रानं रेखा जरे यांच्या गळ्यावर वार केले होते. गंभीर जखमी अवस्थेत रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. (हे वाचा- लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते! ) याप्रकरणी जरे यांच्या आईने आरोपीविरोधात फिर्याद दिली होती. त्यानंतर अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जरे यांच्या मुलाने त्या आरोपींपैकी एकाचा फोटो काढला होता. त्यानुसार पोलिसांनी प्रथम दोन आरोपींना अटक केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तिघांना अटक केली गेली. ज्ञानेश्वर उर्फ गुडु शिवाजी शिंदे (श्रीरामपूर), फिरोज राजू शेख (राहूरी), आदित्य सुधाकर चोळके (कोल्हार बुद्रुक), सागर भिंगारदिवे आणि ऋषिकेश पवार (अहमदनगर) या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर असे समोर आले की एका वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक असलेला बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती. जरे याने अटकपूर्व जामीन मिळवण्याचा देखील प्रयत्न केला होती. पोलिसांनी त्याला फरार घोषित केले होते. पारनेरमधील न्यायालयाने त्याला फरार घोषित करून 9 एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान त्याला कुणीकुणी आश्रय दिला, कुणी त्याला मदत केली याचा शोध घेतला जात आहे. हैदराबाद येथून जरेला अटक करताना पोलिसांनी त्याला मदत करणाऱ्या तिघांना देखील अटक केली आहे. मदत करणाऱ्या आणखी तिघांची नावं पोलिसांना मिळाली आहेत. यात एका महिलाचाही समावेश आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात