Home /News /maharashtra /

लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते!

लाज आणणारी घटना, वृद्ध मृत्यूशी झुंज देत होता आणि पोलीस तमाशा बघत होते!

नागपूर पोलीस दलातील (Nagpur Police) एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबलचे निलंबन करण्यात आलं आहे.

    तुषार कोहळे, नागपूर, 13 मार्च : कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी नागपूर पोलीस दलातील (Nagpur Police) एका पोलीस उपनिरीक्षकासह तीन कॉन्स्टेबलचे निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस उपनिरीक्षक लाखडे आणि कॉन्स्टेबल रोशन यादव, राहुल बोहरे व संजय पांडे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. चौकशीअंती नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी हे निलंबनाचे आदेश दिले. मिळालेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 मार्चला 70 वर्षीय भैयाला बैस हे सकाळी जखमी अवस्थेत पडून असलेले काही नागरिकांना दिसले. तेव्हाच नागपूर पोलीस मुख्यालयात काम करणारे संजय पांडे यांनी बघितले. त्यांनी त्या वृद्धाला पाणी पाजले व मानकापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मात्र पोलिसांना सूचना देऊन पोलीस वेळेवर घटनास्थळी पोहोचलेच नाहीत. त्यामुळो तो वृद्ध दिवसभर जखमी अवस्थेत तिथेच पडून होते. सायंकाळी पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहचले तेव्हा भैयालाल बैस यांचा मृत्यू झाला. याची तक्रार पोलीस आयुक्तांना करण्यात आली. त्यांनतर पोलीस आयुक्तांनी या घटनाक्रमाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्या तपासात हे चार पोलीस दोषी आढळले. त्यामुळे कर्तव्यावर कसूर केल्याप्रकरणी सदर पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. (हे वाचा - पतीसह 4 मुलांना वाऱ्यावर सोडून महिलेनं थाटला दुसरा संसार, प्रकरण आलं अंगलट संजय पांडे हे मुख्यालयात कर्तव्यावर जात असताना जखमीला तेथेच सोडून देत निघून गेल्याने त्यांचे निलंबन झाले, तर पोलीस उप निरीक्षक लाखडे व कॉन्स्टेबल रोशन यादव, राहुल बोहरे हे मानकापूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने त्यांचे निलंबन झाले. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ माजली. भैयाला बैस यांचा मृत्यू देखील संशयास्पद आहे. त्याचा तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनेनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. भैयाला बैस यांना वेळेवर पोलीस मदत मिळाली असती तर ते वाचले असते का ? बघ्याची भूमिका घेणारे नागरिक काय करत होते? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Crime news, Maharashtra, Nagpur, Old man, Shocking news

    पुढील बातम्या