मोठी बातमी! अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझेंचा अर्ज, या तारखेला ठरणार भवितव्य

मोठी बातमी! अटकपूर्व जामिनासाठी सचिन वाझेंचा अर्ज, या तारखेला ठरणार भवितव्य

Mansukh Hiren Case Update: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड आहे. या प्रकरणी चर्चेत असलेल्या सचिन वाझेचं भवितव्य 19 मार्चला निश्चित होण्याची शक्यता आहे

  • Share this:

ठाणे, 13 मार्च: मनसुख मिश्रीलाल हिरेन (Mansukh Hiren) यांच्या हत्ये प्रकरणात कधीही अटक होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवारी 12 मार्च h रोजी सुनावणी झाली. सचिन वाझे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी करणारा युक्तीवाद  न्यायालयात करण्यात आला. त्यानुसार या प्रकरणातील महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकाऱ्यांचे या अटकपूर्व जामीन अर्जावर काय म्हणणे आहे, ते पुढील सुनावणीत मांडले जावे असे आदेश माननीय न्यायालयाने दिलेत. त्यानुसार सचिन वाझे यांनी केलेल्या सचिन वाझेंच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर 19 मार्च रोजी होणार आहे.

सचिन वाझे यांच्यावर मनसुख हिरेन या ठाण्यातील व्यापाऱ्याची हत्या केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने दिलेल्या माहिती नुसार मनसुख यांची पत्नी विमला यांनी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकात FIR दाखल केली आहे. या एफआयआर नुसार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेत. तसंच एफआयआर मध्ये पहिल्यांदा अज्ञात इसम असं आरोपीचे नाव नमूद करण्यात आलं होतं.

(हे वाचा-ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाला पाठवला रिपोर्ट, हल्ला करणाऱ्यांचा उल्लेख नाही)

मात्र 10 मार्चला पुन्हा विमला यांचा जबाब महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाने नोंदवला. त्यावेळेस त्या आपल्या जबाबावर ठाम असल्याने 11 मार्च यादिवशी पुरवणी एफआयआर बनवण्यात आला. त्या पुरवणी एफआयआर मध्ये काही व्यक्तींची नावे आरोपींच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.

(हे वाचा-नागपुरात पोटाची खळगी भरण्यासाठी आलं होतं कुटुंब; मात्र पोलीस कोठडीत झाली रवानगी)

त्यामुळे महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक वादग्रस्त अधिकारी सचिन वाझे यांना कधीही अटक करु शकते या भीतीने सचिन वाझे यांनी लगेच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. सचिन वाझे यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जानुसार त्यांच्यावर हत्या, हत्येचा कट रचणे, गुन्हेगारी कृत्य आणि पुरावे नष्ट करणे असे आरोप ठेवण्यात आले आहेत. यानुसार त्यांच्यावर 302, 201, 34 आणि 120 ( ब ) ही कलमे लावण्यात आली आहेत. त्यामुळे आता 19 मार्च या दिवशी सचिन वाझे यांचे भवितव्य ठरणार आहे. न्यायालय सचिन वाझे यांचा अटक पुर्व जामिन अर्ज मान्य करणार की फेटाळणार हे सर्वस्वी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाचे तपास अधिकारी हे न्यायालयात सचिन वाझे यांच्या जामीन अर्जावर काय भुमिका मांडतात यावर अवलंबून आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 13, 2021, 7:48 AM IST

ताज्या बातम्या