Home /News /maharashtra /

कुणी आयुष्यात उठेल असं बोलू नका, फडणवीसांनी उल्लेख केलेल्या धनंजय गावडेंची प्रतिक्रिया

कुणी आयुष्यात उठेल असं बोलू नका, फडणवीसांनी उल्लेख केलेल्या धनंजय गावडेंची प्रतिक्रिया

'एका बिल्डराला वाचवण्यासाठी या लोकांनी आपली प्रतिष्ठा वापरायला नको होती. कोणत्या बिल्डराला वाचवत आहे?

    नालासोपारा, 09 मार्च :  मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren death case) अधिवेशनात (maharashtra budget session 2021)तीव्र पडसाद उमटले. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) यांच्या अटकेची मागणी केली आहे. तसंच धनंजय गावडे (Dhanjay Gavade) यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. पण, कुणी आयुष्यात कायमचं उठेल असं वक्तव्य करू नका, पुरावे असतील तर तपास यंत्रणेकडे द्या, असं उत्तर धनंजय गावडेंनी दिलं. नालासोपाऱ्याचे शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय गावडे यांनी न्यूज18 लोकमतशी बातचीत केली आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी केलेल्या आरोपांचं खंडन केलं. 'मला आश्चर्य वाटतंय मनसुख हिरेन प्रकरणात माझे नाव आले आहे. धनंजय गावडे यांना सचिन वाझे नावाचा अधिकारी वाचवत आहे. त्यांना पुरावे विचारण्यात आले होते, त्यांनी नकार दिला होता.  प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे जबाबदार नेते आहे. आज सुद्धा विधानसभेत या प्रकरणाचा उल्लेख केला गेला. मला याबद्दल वाईट वाटत आहे एवढ्या मोठ्या नेत्यांनी माझ्या नावाचा उल्लेख करावा. एनआयए संस्था, मुंबई पोलीस, महाराष्ट्र एटीएस तपास करत आहे. फक्त मनसुख यांचे लोकेशन नालासोपाऱ्यात सापडले म्हणून माझे नाव घेणे हे कोणत्या तरी बिल्डर लॉबीला पाठिशी घालण्याचे कारस्थान आहे' असा पलटवार धनंजय गावडेंनी केला. भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी 'राहिली गोष्ट गुन्हाची तर सुप्रीम कोर्टाने मला अंतरीम जामीन दिला आहे. माझ्या विरोधात कोणतेही गुन्हे दाखल झाले नाही. याबद्दल पोलिसांनी आरोपपत्र सुद्धा दाखल केले असून त्यात माझे नाव नाही' असंही गावडे म्हणाले. 'कुणाची बदनामी होईल असे वक्तव्य करू नये, कोणत्याची पुराव्या शिवाय बोलू नये जर पुरावे असतील तर पोलीस तपास यंत्रणेकडे द्यावे. पण, कुणालाही आयुष्यातून उठवण्याचे प्रयत्न करू नये' असंही गावडे म्हणाले. सुव्रत जोशी झालाय JOBLESS! स्वत: दिली अशी माहिती, वाचा नेमंक झालंय तरी काय 'एका बिल्डराला वाचवण्यासाठी या लोकांनी आपली प्रतिष्ठा वापरायला नको होती. कोणत्या बिल्डराला वाचवत आहे, याबद्दल योग्य वेळी नावं समोर येईल' असा इशाराही गावडेंनी दिला. रणबीरचा कोरोना अहवाल आला पॉझिटिव्ह, नीतू कपूर यांनी दिली माहिती '2017 च्या गुन्ह्याबद्दल आज फडणवीस यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. पण या गुन्ह्यात मी आरोपी नाही. या गुन्ह्यात माझा कोणताही सहभाग नाही. याबद्दल तपास अधिकाऱ्यांनी आपला अहवाल हा सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. त्यामुळे वडाचे साल पिंपळाला लावून बिल्डराला वाचवण्यासाठी हे थांबले पाहिजे' असा टोलाही गावडे यांनी लगावला. काय म्हणाले होते फडणवीस? 'मनसुख यांनी भावासोबत आणि वकीलांशी बोलून घ्यायला सांगितले होतं. हा खून वाझे यांनी केला असावा माझा संशय आहे. 2017 मध्ये एक एफआयआर दाखल असून 40  लाखांनी खंडणी मागितली. या प्रकऱणात धनंजय गावडे, सचिन वाझे यांची नावे समोर आली.  मनसुख यांचं शेवटचं लोकेशन गावडे यांच्याकडे होतं आणि त्या नंतर 40 किमी दूर मृतदेह आहे. मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला. पण ओहाटी असल्यामुळे मनसुख यांचा मृतदेह बाहेर आला' असंही फडणवीस म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Budget 2021, देवेंद्र फडणवीस

    पुढील बातम्या