Home /News /technology /

भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; आता आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी

हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फक्त चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसोबतच रिअलमी ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातूनही खरेदी करू शकता.

नवी दिल्ली, 9 मार्च : स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या कार्निवल सेलमधून (flipkart smartphone offers) तुम्ही रिअलमी (realme) स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करु शकता. हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी फक्त चार दिवसांचा अवधी शिल्लक आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसोबतच रिअलमी ऑनलाइन स्टोअरच्या माध्यमातूनही खरेदी करू शकता. या सेलमध्ये ॲक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर डिस्काउंट देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर अनेक स्मार्टफोन्सवर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. मात्र रिअलमी X7 Pro, रिअलमी नार्जो 30A , रिअलमी नार्जो 30 Pro आणि रिअलमी X50 Pro हे स्मार्टफोन खूप स्वस्तामध्ये खरेदी करता येतील. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये रिअलमीच्या 5G स्मार्टफोनवर चांगला डिस्काउंट देण्यात आला आहे. ज्यामध्ये भारताचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन नार्जो 30 Pro देखील उपलब्ध आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये नार्जो 30 Pro स्मार्टफोन 16,999 रुपयांऐवजी फक्त 15,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. म्हणजेच या स्मार्टफोनवर 1 हजार रुपयांची सूट देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त 5G नसलेला लेटेस्ट स्मार्टफोन नार्जो 30A वर 750 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 8,999 रुपयांऐवजी फक्त 8,249 रुपयांना मिळू शकतो.

(वाचा - गाडीला FASTag नसेल,तर वाहनाचा इन्शोरन्सही होणार नाही,लागू होणार ही नवी व्यवस्था)

Realme Narzo 30 Pro 5G या स्मार्टफोनला 6.5 इंची फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचा स्क्रीन रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेला पंच होल डिझाइन देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन अ‍ॅड्राइड 10 ओएसवर आधारित आहे आणि तो MediaTek Dimensity 800U प्रोसेसरवर काम करतो. ट्रिपल कॅमेरा - या स्मार्टफोनला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा प्रायमरी सेंसर 48 मेगापिक्सल आहे. तर यात 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आहे. या स्मार्टफोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी पंच होल कटआउटसोबत 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

(वाचा - इतक्या किंमतीत तर BMW येईल; हे आहेत जगातील पाच सर्वात महागडे स्मार्टफोन)

पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळेल. जी 30W डार्ट चार्ज सपोर्टसोबत येते. कंपनीने दावा केला आहे की, ही बॅटरी 65 मिनिटात 100 टक्के चार्ज होते. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G, वायफाय, ब्ल्यूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
First published:

Tags: Mobile Phone, Realme, Smartphone, Tech news

पुढील बातम्या