जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अभिनेता सुव्रत जोशी झालाय JOBLESS! स्वत: दिली अशी माहिती, वाचा नेमंक झालंय तरी काय

अभिनेता सुव्रत जोशी झालाय JOBLESS! स्वत: दिली अशी माहिती, वाचा नेमंक झालंय तरी काय

अभिनेता सुव्रत जोशी झालाय JOBLESS! स्वत: दिली अशी माहिती, वाचा नेमंक झालंय तरी काय

Marathi web series: मराठी प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा एकदा लवकरच मराठी वेब सीरीज येणार आहे जी सस्पेंस क्राईम थ्रिलर असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 मार्च: ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर लॉकडाऊनच्या काळात अनेक वेबसीरिज प्रदर्शित झाल्या आहेत. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी विविध विषयांवरील सीरिज प्रदर्शित केल्या आहेत. आता अशातच मराठी मनोरंजन विश्वातून प्लॅनेट मराठीकडून (Planet Marathi) प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ‘प्लॅनेट मराठी’ आता त्यांची तिसरी वेब सीरीज घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जॉबलेस’ (Jobless) असं या वेब सीरीजचं नावं आहे. ‘जॉबलेस’ (Jobless) मध्ये मुख्य भूमिकेत ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil dosti duniyadari) या गाजलेल्या मालिकेतला सुजय अर्थातच सुव्रत जोशी (suvrat joshi) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ही वेब सीरीज (Web Series) सस्पेंस क्राईम थ्रिलर (Suspense crime thriller) जॉनरमधली असून सुव्रत यात एका ‘जॉबलेस’ तरुणाची भूमिका साकारताना यात आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. एक चुकीचा निर्णय कसा गुन्हेगारीच्या दुनियेतील चक्रव्यूहात अडकवू शकतो, या मूळ संकल्पनेवर या वेब सीरीजची कथा आधारीत असल्याचं समजत आहे. काय आहे ‘जॉबलेस’****? वेबसीरीजच्या टायटल वरूनच समजत की ही एका नोकरी करणाऱ्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. त्याच्या एका छोट्याशा नजरचुकीनं तो गुन्हेगारी विश्वात अशा पद्धतीने अडकत जातो की त्याला बाहेर पडायचे सगळे मार्ग बंद झालेले दिसतात. आणि तो अधिक त्यात अडकत जातो.

जाहिरात

(हे वाचा -  VIDEO: चित्रपटाच्या सेटवरची गर्दी पाहून घाबरला वरुण; गाडीवर चढून चाहत्यांसमोर जोडले हात **)** **‘जॉबलेस’**मध्ये दिसणार ही कलाकार मंडळी: प्रेक्षकांना आता वेब सीरीजच्या कथेसोबतचं त्यातल्या कलाकारांबद्दल सुद्धा खूप जास्त आकर्षण असत. या वेब सीरीजमध्ये सुव्रत बरोबर हरीश दुधाडे, पुष्कर श्रोत्री, मयुरी वाघ, स्वप्नाली पाटील, राधा धरणे हे कलाकाराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही वेबसीरीज 7 भागांची असणार आहे. निरंजन पत्की याचं दिग्दर्शन करत आहेत. प्लॅनेट मराठी वर ही लवकरच प्रदर्शित केली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात