...म्हणून रावसाहेब दानवे पत्रकार परिषदमधून उठून गेले, राजू शेट्टींची घणाघाती टीका

...म्हणून रावसाहेब दानवे पत्रकार परिषदमधून उठून गेले, राजू शेट्टींची घणाघाती टीका

रावसाहेब दानवे यांना थेट चीननं धमकी दिली असेल. म्हणून ते पत्रकार परिषद अर्ध्यात मधून उठून गेले, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 15 डिसेंबर: 'मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरचा नाही. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, असं सांगून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पत्रकार परिषद अर्ध्यात सोडून उठून गेले. रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबद्दल वादगस्त विधान केलं होतं. याबाबतही त्यानं यावेळी स्पष्टीकरण दिलं नाही. यावरून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधला आहे. रावसाहेब दानवे यांना थेट चीननं धमकी दिली असेल. म्हणून ते पत्रकार परिषद अर्ध्यात मधून उठून गेले, अशा शब्दात राजू शेट्टी यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

हेही वाचा...अन्वय नाईक,कंगना प्रकरणावरून विधानसभेत राडा, फडणवीस आणि परब यांच्यात जुंपली

राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली. ते म्हणाले, दानवे यांनी त्यांचं नाव घेतल्यामुळे चीनला प्रचंड संताप आला असेल. आणि चीनसारखी महासत्ता मागे लागली तर आपलं काही खरं नाही असं दानवे यांना वाटलं असेल, अशा मिश्किल शब्दात राजू शेट्टी यांनी टोला लगावला.

राजू शेट्टी यांनी यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीकेची तोफ डागली. भाजपचा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष कोण असावा हा त्यांचा प्रश्‍न आहे. पण जर ते काही वटवट करत असले तर आम्ही ऐकून घेणार नाही, असा सज्जड इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला.

सदाभाऊ खोत हे कुठल्या तर तीर्थक्षेत्रला जाऊन आले असतील. म्हणून कदाचित ते कृषी विधेयकांवर दुग्धाभिषेक करत असतील, असा टोला राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लगावला.

देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची पुस्तिका काढायची असेल तर अवश्य काढावी...

राजू शेट्टी म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचाराची पुस्तिका काढायची असेल तर अवश्य काढावी. भ्रष्टाचाराचं समर्थन कुणीही करणार नाही. गाडीभर पुरावे काढून गाडीच गायब होऊ नये म्हणजे झालं, अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

राज्यात भाजपची शेतकऱ्यांच्या बाजुने भूमिका आणि दिल्लीत मात्र शेतकऱ्यांना अडवायचं? असा सवाल राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गेल्या आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. त्यावरून राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे कुणाचंही ऐकायला तयार नाहीत. सरकार आरोप करत की आंदोलनाला विरोधी पक्षात ताकद देत आहे. पण सामाजिक प्रश्न घेऊन जनांदोलन उभारल्यावर विरोधी पक्ष या आंदोलनाला पाठिंबा देत असतं. यापूर्वी भाजपनेही रामलीला मैदानावरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता, असंही राजू शेट्टी यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा...धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन नवा शेतीविषयक धोरण शेतकरी हिताचे आहे, असा खुलासा केला. मात्र, त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर ते म्हणाले, मी हाडाचा शेतकरी आहे. कागदावरचा शेतकरी नाही. मी जनावरं आपल्या हाताने धुतले आहेत. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला आहे. एवढंच त्यांनी उत्तर दिलं. शेतकऱ्यांची माफी मागणार का? असा प्रश्न पत्रकारांनी करताच ते पत्रकार परिषद अर्ध्यात सोडून उठून गेले.

Published by: Sandip Parolekar
First published: December 15, 2020, 4:41 PM IST

ताज्या बातम्या