अन्वय नाईक,कंगना प्रकरणावरून विधानसभेत राडा, फडणवीस आणि परब यांच्यात जुंपली

'सत्ता डोक्यात जाता कामा नये. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर त्याचा सूड मुंबईवर उगवू नका. अन्वय नाईक यांच्या कुटुंबाबद्दल पूर्ण सन्मान आहे'

'सत्ता डोक्यात जाता कामा नये. एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर त्याचा सूड मुंबईवर उगवू नका. अन्वय नाईक यांच्या कुटुंबाबद्दल पूर्ण सन्मान आहे'

  • Share this:
    मुंबई, 15 डिसेंबर : अन्वय नाईक आत्महत्या (Anvay Naik suicide case) आणि कंगना रनौत (kangana ranaut) कार्यालयावर तोडकाम प्रकरणावरुन आज हिवाळी अधिवेशात महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार राडा पाहण्यास मिळाला. ही प्रकरणं न्यायालयात आहे त्यावर चर्चा करू नको, असा आक्षेप सत्ताधाऱ्यांनी घेतला, तर 'महाराष्ट्र काय पाकिस्तान नाही, सत्ता डोक्यात जावू देऊ नका, कायद्याने वागा', असा पलटवार भाजपने केला. भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुरवणी मागण्यावरून बोलताना मराठा, ओबीसी आरक्षण, शेतकरी मदत आणि जलयुक्त शिवार योजनेवरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला केला. तसंच यावेळी अन्वय नाईक प्रकरणावरून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (arnab goswami ) यांच्या अटकेवरून फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. पुण्यातल्या शाळांचा मोठा निर्णय; पालकांवर आरोप करत वर्गच ठेवले बंद 'कंगना रनौत आणि अर्णब गोस्वामी काय बोललं त्याचं आम्ही समर्थन करत नाही.  मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा आदरानेच केला पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्णब गोस्वामी जे बोलले ते चुकीचे आहे. कंगनाच्या ट्विटचं समर्थन नाही. चुकीचं बोललं गेले असेल तर अवमान झाल्याचा खटला आहे, पण कोणाचं घर तोडता येत नाही. आमच्या विरोधात बोलालं तर केस करू हे बरोबर नाही. आज कायद्याचं राज्य दिसत नाही' अशी टीका फडणवीस यांनी केली. तसंच, 'सत्ता डोक्यात जाता कामा नये.  एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली तर त्याचा सूड मुंबईवर उगवू नका. अन्वय नाईक यांच्या कुटुंबाबद्दल पूर्ण सन्मान आहे. पण मराठीबद्दल दुःख आणि अमराठीबद्दल दुःख असं नाही. हे कायद्याचे राज्य आहे हे काही पाकिस्तान नाही. ही लोकशाही आहे, लोकशाहीने कारवाई करावी, असा टोला फडणवीस यांनी लगावला. फडणवीस यांच्या टीकेला उत्तर देत अनिल परब यांनी जोरदार उत्तर दिले. ज्या कलमाखाली कारवाई करायची होती, ते सुप्रीम कोर्टाने याचिकेत सांगितले आहे. 364 जर चुकीची कारवाई असेल तर 351 मध्ये कारवाई करा असे आदेश कोर्टाने दिले आहे. आधी याचिका नीट वाचा. या महाराष्ट्रात जर कुणी कुणाचा खून केला, कुणी आत्महत्येला प्रवृत्त केले, कुणी अनधिकृत बांधकामावर कारवाई करायची नाही का? असं जर म्हणणं असेल तर भाजपने स्पष्ट सांगावे. किंवा तुम्ही याची जबाबदारी घेणार आहात का, गुन्हेगारांना वाचवण्याची जबाबदारी घेणार आहात का? हेही सांगा अशा शब्दांत परब यांनी फडणवीस यांना टोला लगावला. धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल तर 'भारताच्या कोणत्याही ठिकाणी एखादा विजय न्यायालयीन चर्चा होत असेल तर सभागृहात बोलता येत नाही. या प्रकरणावर जर न्यायालय निर्णय देत असेल, त्यावर सभागृहात बोलता येणार नाही, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले. 'सभागृहात बोलू नये हा निर्णय आहेच. पण, सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णय बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. तुम्हाला राज्य चालवायचं आहे खुशाल चालवा, 25 वर्ष चालवा पण कायद्याने चालवा. दिल्ली, हरियाणा यांच्याबद्दल बोलायचं त्याआधी आपल्या पायाखाली काय आहे ते पाहा, आपण काय दिवे लावले आहे ते पाहा' असं म्हणत फडणवीस यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस आणि परब यांच्यामध्ये खडाजंगी झाल्यामुळे विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली. पण तरीही वाद सुरू होता. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आपण बरंच काही शिकलो आहोत, त्यांचे पुस्तकही माझ्याकडे आहे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
    Published by:sachin Salve
    First published: