जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

धक्कादायक! पुण्यात माजी आमदारांविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 15 डिसेंबर: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील औंध परिसरात एका व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पुण्यातील चतुश्नूंगी पोलीस स्टेशनमध्ये हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा… VIDEO: पुण्यात वाढदिवसाच्या नावाखाली धिंगाणा! बर्थडे बॉयवरच अंड्यांचा वर्षाव अमन अजय चड्डा (वय-28, रा. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून हर्षवर्धन रायभान जाधव (वय- 43, बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय-37, वाकड, पुणे ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्यामाहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा हे त्यांचे आई-वडील सोमवारी सकाळी 8 वाजता दुचाकीने औंध येथील ब्रेमन चौकाकडे जात होते. यावेळी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या कारचा दरवाजा अचानक उघडला. त्यामुळे चड्डा यांचे आई-वडीलांची दुचाकी थेट जाधव यांच्या कारवर धडकली. यावेळी इषा झा या देखील गाडीत होत्या. याबाबत अजय चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. मात्र, हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांना अनय चड्डा यांच्या आई-वडिलांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ‘मी हार्ट पेशन्ट आहे. मला मारू नका’, असं अजय चड्डा वारंवार सांगत होते. तरी देखील जाधव आणि झा या दोन्ही आरोपींनी चड्डा यांच्या छाती आणि पोटावर लाथा मारल्या. हेही वाचा.. माझा पेपर, माझी मुलाखत.. माझे पोलीस, माझा एफआयआर; मुनगंटीवारांनी उडवली खिल्ली या प्रकरणी अमन चड्डा यांनी पुण्यातील चतुश्नूंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा या दोघांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांना दोन्ही आरोपींना अद्याप अटक केलेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात