रत्नागिरी 17 ऑक्टोबर : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील 40 आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सरकार कोसळलं, इतकंच नाही तर अंधेरी पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं चिन्ह आणि नावही गोठवलं गेलं. मात्र, आता शिवसेना उपनेते ठाकरे गट आणि आमदार राजन साळवी यांनी मात्र आपण मरेपर्यंत शिवसैनिक राहाणार असल्याचं सांगत शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पुण्यात शिंदे गट करणार धमाका; मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते लागले गळाला? राजन साळवी यावेळी बोलताना म्हणाले, की माझी निष्ठा बाळासाहेब यांच्या चरणाशी आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक राहील आणि कुठेही जाणार नाही. उदय सामंत यांना टोला लगावताना राजन साळवी म्हणाले, की काही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून अशा चर्चा केल्या जात आहेत. माझी सुरक्षा काढल्यास शिवसैनिक माझी काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातल्या रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात उदय सामंत यांच्याविरोधात राजन साळवी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा दबक्या आवजात काही दिवसांपासून सुरू होती, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करणार आहे. मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही, असं साळवी यांनी स्पष्ट केलं. मात्र, पक्षप्रमुख जो उमेदवार देणार त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. ‘अन्याय होत असेल तर कोर्टात जा, कोणताच गुन्हा..’, गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर राजन साळवी यांना नाणार प्रकरणी धमकी देण्यात आली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साळवी म्हणाले, की मला नाणार प्रकरणात धमकी आली होती. त्यानंतर पोलीस, एसआयडी यांनी रिपोर्ट दिला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मला वाय प्लस सुरक्षा दिली होती. आता मला केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांची सुरक्षा आहे. मी गृहमंत्र्यांनाही सुरक्षेबाबत पत्र दिलं आहे. मात्र, माझी सुरक्षा काढल्यास शिवसैनिक माझी काळजी घेतील, असं ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.