Home /News /maharashtra /

Raigad News : रोहा मार्गावर मृत्यूतांडव, भरधाव ट्रकने 8 जणांचा चिरडले, 4 जागीच ठार

Raigad News : रोहा मार्गावर मृत्यूतांडव, भरधाव ट्रकने 8 जणांचा चिरडले, 4 जागीच ठार

या घटनेने सर्वत्र हाहाकार उडाला असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

रायगड, 31 मार्च :  रायगड (Raigad) जिल्ह्यातील रेवदंडा रोहा मार्गावर (Revdanda Roha) एका मद्यधुंद ट्रकचालकाने (Truck) बेफामपणे ट्रक चालवून 8 जणांना चिरडल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. या अपघातात 4 जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रेवदंडा बाजूकडून MH 04 EY 8501 या ट्रकच्या चालकाने बेधुंदपणे गाडी चालवत साळाव, आमली येथे प्रत्येकी एका व्यक्तीला तर चेहेर येथे दोन व्यक्तींना ठोकर मारुन जखमी केले. त्यानंतर भरधाव वेगाने गाडी रोहा बाजूकडे चालवत नेली. पुढील गावात सदर घटनेची खबर मिळताच स्थानिकांनी सदर ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता या ट्रकचालकाने अनेक गाड्या व अडथळे उडवून लावत न्हावे फाटानजीक एका जोडप्याला व त्यांच्या लहानग्या मुलाला उडवले. 'कोविड झाल्यापासून मला सगळं उलटं दिसतंय', कार्तिक आर्यनने शेअर केला PHOTO यामध्ये जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण ढेबे त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नीचे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. सदर धडक इतकी जोरात होती की, अपघातग्रस्त शिक्षकाच्या गाडीचा चक्काचूर झाला असून गाडी सुमारे चारशे मीटर फरफटत गेली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, भरधाव ट्रकने चार जणांना चिरडले यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.  रस्त्यावर अक्षरश: रक्तांचा सडा आणि मृतदेहांचा खच पडला होता. जखमी नागरिकांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. यात दोन जणांची प्रकृती अजून चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. OMG! एक किलोसाठी मोजावे लागतात एक लाख; सोन्यापेक्षाही महाग आहे ही भाजी भरधाव ट्रकचालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण, पुढे काही अंतरावर स्थानिक तरुणांनी या ट्रकचालकाला पकडले. चालकाला पकडल्यानंतर बेदम चोप देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिसांनी ट्रक चालकाला सांडगाव या ठिकाणी ताब्यात घेतले. या घटनेने सर्वत्र हाहाकार उडाला असून मृतांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Accident, Raigad, Raigad news, Truck accident, अपघात, रायगड

पुढील बातम्या