मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'कोविड झाल्यापासून मला सगळं उलटं दिसतंय', कार्तिक आर्यनने शेअर केला PHOTO

'कोविड झाल्यापासून मला सगळं उलटं दिसतंय', कार्तिक आर्यनने शेअर केला PHOTO

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन त्याच्या मजेदार स्वभावासाठी ओळखला जातो. त्याने इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला असून कोविडनंतर आपल्याला सगळं उलटं दिसतंय असं त्याने म्हटलं आहे. त्याचा हा फोटो इन्स्टाग्रावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 31 मार्च: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) देशातील युवकांमध्ये खूपचं लोकप्रिय आहे. चित्रपटातील आपल्या विनोदी स्वभावामुळे आणि अभिनय शैलीमुळे त्याने खूप कमी काळात बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यावर्षी त्याच्याकडे बॉलिवूडचे बडे प्रोजेक्ट आहेत. त्यामुळे हे वर्ष त्याच्यासाठी खूपच व्यस्त आहे. मात्र चित्रपटाचं शुटींग सुरू असताना त्याला अचानक कोविडची लागण (Infected with corona virus) झाल्याने सर्व चित्रपटांचं चित्रीकरण थांबवण्यात आलं आहे. कार्तिक आर्यन सध्या कोरोनावर उपचार घेत असून त्याला घरातच क्वारंटाइन (Home Quarantine) केलं आहे. कार्तिक आर्यनने आपल्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, कोविडची लागण झाल्यापासून सर्वकाही उलटं दिसत आहे. या फोटोमध्ये कार्तिक हँडस्टँड करताना दिसत आहे. त्याच्या बाजूला एक बॅगही ठेवली आहे. ज्यावरून तो व्यायाम करत असल्याचं वाटत आहे. खंरतर कार्तिकला घरातच क्वारंटाइन केल्याने त्याला वर्क आऊट करण्यासाठी जिममध्ये जाता येत नाहीये. त्याची ही अडचण त्याने आपल्या फोटोच्या कॅप्शनमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होतं आहे.
कार्तिकला कोरोना झाल्याची माहिती त्याने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली होती. त्यावेळी त्याने प्लसचं चिन्ह असलेला एका फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली होती. त्याची प्रकृती ठिक होण्यासाठी अनेक चाहत्यांनी प्रार्थनाही केली होती. (वाचा- VIDEO : कार्तिकसोबत साराला पाहून चाहत्यानं म्हटलं ‘भाभी’, आणि...) कार्तिकने 'धमाका' या चित्रपटासाठी 10 दिवस काम करण्यासाठी 20 कोटी रुपये घेतले आहेत. तर 'प्यार का पंचनामा' या त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी कार्तिकने 1.25 लाख रुपये घेतले होते. गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी यांसारख्या कलाकारांना कोरोना झाल्यानंतर कार्तिकलाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कार्तिकचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या आगामी 'भूल भुलैय्या 2' या चित्रपटाचं शूटिंग थांबवण्यात आलं होतं.
First published:

Tags: Bollywood News, Coronavirus symptoms, Kartik aryan, Viral photo

पुढील बातम्या