पिंपरी-चिंचवड, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. अनेक राजकीय नेते आणि संघटनांनी भगतसिंग कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनीही राज्यपालांना सुनावलं आहे.
'राज्यपालांबद्दल आम्हाला प्रोटोकॉलनुसार बोलता येत नाही, पण त्यांना काही प्रोटोकॉल नाहीये. ते काहीही बेफाम बोलतात, त्यांच्या पदाला ते न शोभणारं आहे,' अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केलीय.
'...तर राज्यपाल महोदयांनी पदावर राहण्याबाबत गांभीर्यानं पुनर्विचार करावा'; अजित पवारांनी सुनावलं
दुसरीकडे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्रिवेदी यांच्या वक्तव्याचाही सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला. त्रिवेदींना नक्की कोण इतिहास सांगतं. आपण कधीच असं वाचलं नाही. आम्ही त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहोत, असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.
हे लोक छत्रपतींबद्दल बोलू शकतात तर काहीही करू शकतात, पण आम्ही छत्रपतींबद्दल आता ऐकून घेणार नाही, असं आव्हान सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे.
राज्यपालांचं धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे रोख बक्षीस, राष्ट्रवादी कार्यकर्त्याची बॅनरबाजी
काय म्हणाले भगतसिंग कोश्यारी?
'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी गडकरी आणि पवारांची तुलना महापुरुषांशी केली.
सुधांशू त्रिवेदी यांच्या वक्तव्याचा वाद
दरम्यान भाजप खासदार आणि प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही नव्या वादाला तोंड फोडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्र लिहिली, असं त्रिवेदी म्हणाले.
नारायण राणेंच्या मुलाने राज्यपालांना सुनावले खडेबोल, म्हणाले....
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.