मुंबई, 20 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. विरोधकांकडून टीका सुरू असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबावर एकदाही टीकेची संधी न सोडणारे निलेश राणे यांनी राज्यपालांच्या विधानावरून तीव्र संताप व्यक्त केला.
महामहीम राज्यपाल साहेब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 19, 2022
‘महामहीम राज्यपाल साहेब, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही’ अशा शब्दांत निलेश राणे यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा : संभाजीराजे छत्रपती दरम्यान, राज्यपालांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून संभाजीराजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ( ‘शिवाजी तर जुने झाले आहे’, राज्यपाल कोश्यारींचं पुन्हा बोलले ) याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. काय म्हणाले राज्यपाल? ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. (Satara: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं; परिसरात जमावबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त) ‘तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही’ असंही राज्यपाल म्हणाले.