मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपालांचं धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे रोख बक्षीस, राष्ट्रवादी कार्यकर्त्याची बॅनरबाजी

राज्यपालांचं धोतर फाडणाऱ्यास 1 लाखांचे रोख बक्षीस, राष्ट्रवादी कार्यकर्त्याची बॅनरबाजी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध करत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध करत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध करत...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 20 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादीने निषेध व्यक्त करत बॅनरबाजी केली आहे. राज्यपाल यांचं धोतर फाडणाऱ्याला 1 लाखांचे रोख बक्षीस दिले जाईल, अशी घोषणाच केली आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याचा निषेध करत पुण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संदीप शशीकांत काळे यांनी बॅनर लावले आहे.

आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श होते आणि कायम राहणारच. उतरत्या वयात धोत्रात घाण करण्यासारखे विषारी वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आहे. त्यांचे धोतर फाडणाऱ्यास आणि फेडणाऱ्यास १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असा मजकूर या बॅनरवर आहे.

(नारायण राणेंच्या मुलाने राज्यपालांना सुनावले खडेबोल, म्हणाले....)

दरम्यान, राज्यपालांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला असून संभाजीराजे छत्रपती यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं म्हणत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांना महाराष्ट्राबाहेर काढा, असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं.

(Satara: अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवलं; परिसरात जमावबंदीसह मोठा पोलीस बंदोबस्त)

काय म्हणाले राज्यपाल?

'आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील' असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली.

First published:

Tags: Marathi news