पुणे 21 ऑक्टोबर : खासदार सुप्रिया सुळे पुरंदरच्या दौऱ्यावर आहेत. पुरंदर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. पांगारे गावात सुप्रिया सुळेंनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत कर्जमाफीची मागणीही केली. गेल्या काही दिवसांत भरपूर पाऊस झाला आहे. त्यामुळे, ओला दुष्काळ जाहीर करावा तसंच सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. पाणीपुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 25 दिवसांपासून पाणीच नाही, पाटील म्हणताय, काय आकाशातून पाणी टाकू? सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सरकारचे दिवाळी गिफ्ट अजून पोहोचले नाहीत. कारण त्यांना पाहिजे असणारे फोटो त्यावर लागले पाहिजेत. एकवेळ माणूस उपाशी राहिला तरी चालेल पण फोटो लागला पाहिजे, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्य सरकारला सर्वसामन्यांचं घेणं-देणं नाही. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर कुणीही जात नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. यासोबतच त्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या डायलॉगची आठवण करून देत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की आमच्या शेतकऱ्यांकडे ना झाडी आहेत ना हॉटेल ना 50 खोके आहेत. ही दिवाळी आपल्यासाठी गोड नाही. कारण एवढा पाऊस झाला आहे, की आपली दिवाळी गोड झालेली नाही. सरकारला विनंती आहे तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि आधी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा. आम्ही पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे-फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केल्यानंतर सरकारमधील मंत्र्यांवरही कडाडून टीका केली आहे. त्या म्हणाल्या की सध्या मंत्रालयात कुठलेही मंत्री बसत नाहीत. पूर्वी मंत्रालयात शिरलं की सर्व मंत्री भेटायचे. मात्र, आता मंत्र्यांना भेटायचं म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात जावं लागतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.