जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पाणीपुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 25 दिवसांपासून पाणीच नाही, पाटील म्हणताय, काय आकाशातून पाणी टाकू?

पाणीपुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 25 दिवसांपासून पाणीच नाही, पाटील म्हणताय, काय आकाशातून पाणी टाकू?

 पंपात गाळ साचून पंप बंद झाल्याने तांत्रिक पाणीटंचाई झाल्याचे म्हणत आता काय आकाशातून पाणी टाकू का?

पंपात गाळ साचून पंप बंद झाल्याने तांत्रिक पाणीटंचाई झाल्याचे म्हणत आता काय आकाशातून पाणी टाकू का?

पंपात गाळ साचून पंप बंद झाल्याने तांत्रिक पाणीटंचाई झाल्याचे म्हणत आता काय आकाशातून पाणी टाकू का?

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 21 ऑक्टोबर : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव शहरात गेल्या 25 दिवसापासून पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणगाव शहरातील नागरिकांना अक्षरशः विहिरीतील व गुरांचे पिण्याचे दूषित पाणी वापरण्याची वेळ आली आहे. राज्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदार संघात असलेल्या धरणगाव शहरात पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. केल्या 25 दिवसापासून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. खरंतर ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून धरणगाव शहरात ही परिस्थिती असून पाणीपुरवठा मंत्री आपल्या मतदारसंघातील असताना देखील धरणगाव शहराचा पाणी प्रश्न मात्र सुटला नसल्याने नागरिकांनी आंदोलन करत रोष देखील व्यक्त केला. मात्र तरी देखील प्रशासनाकडून केवळ आश्वासन देऊन वेळ मारून नेली जात आहे. (VIDEO: पुण्याजवळ वाहतूक कोंडीत अडकल्या सुप्रिया सुळे, वैतागून गाडीतून उतरल्या अन्…, पाहा पुढे काय घडलं) धरणगाव शहराचा पाणी प्रश्न भीषण असताना यावर प्रतिक्रिया देत गुलाबराव पाटील यांनी नदीला पुर आल्याने पंपात गाळ साचून पंप बंद झाल्याने तांत्रिक पाणीटंचाई झाल्याचे म्हणत आता काय आकाशातून पाणी टाकू का? अशी वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन पाणी प्रश्न बाबत संताप व्यक्त केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर अनेकांनी रोज देखील व्यक्त केला गुलाबराव पाटील यांनी आकाशातून पाणी न देता आम्ही जो पाण्याचा कर भरतोय ते हक्काचे पाणी आम्हाला द्यावे अशी मागणी केली जात आहे. (परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था; कृषीमंत्री म्हणतात…ओला दुष्काळ नाहीच!) मात्र, भीषण पाणीटंचाई असताना सणासुदीच्या काळात सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो महिलांना त्यामुळे विद्यार्थिनींपासून अबालृद्ध महिलांपर्यंत सर्वांनाच पाण्यासाठी भटकंती करावे लागत आहे. त्यामुळे महिलांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे.

‘मला गुलाबराव नाही तर पाणीवाला बाबा व्हायचा आहे’ असे गुलाबराव पाटील म्हणतात मात्र त्यांच्या मतदारसंघात 25-25 दिवस पाणी मिळत नसेल तर नागरिकांनी न्याय तरी कोणाकडे मागायचा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात