मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे-फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक

3 लाख कोटींचा प्रकल्प राज्याबाहेर जाणार? शिंदे-फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक

 वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी वेगाने हालचाली सुरू

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी वेगाने हालचाली सुरू

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी वेगाने हालचाली सुरू

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 ऑक्टोबर : ‘वेदांत-फॉक्सकॉन’ प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने राज्य सरकारवर विरोधकांकडून टीकेचा वर्षाव झाला. त्यामुळे आता तीन लाख कोटींचा नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प राज्यातच उभारावा, याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उद्योग विभागाच्या उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि शिंदे सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला होता. पण, आता तब्बल 3 लाख कोटी तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहे. वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरून टीकेचे धनी ठरलेल्या राज्य सरकारने सुमारे तीन लाख कोटींचा तेलशुद्धीकरण प्रकल्प राज्याबाहेर जाऊ नये, यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. गुरुवारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नाणार प्रकल्पाबाबत चर्चा झाली.

(पाणीपुरवठा मंत्र्याच्या मतदारसंघात 25 दिवसांपासून पाणीच नाही, पाटील म्हणताय, काय आकाशातून पाणी टाकू?)

महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू येथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाणार येथे भूसंपादन झाले असल्याने आणि प्रकल्पासाठी हीच जागा सुयोग्य असल्याने तिथे प्रकल्प उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय.

(परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था; कृषीमंत्री म्हणतात...ओला दुष्काळ नाहीच!)

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना करण्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक तब्बल 14 महिन्यानंतर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत ‘नाणार’ तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारने हा प्रकल्प नाणारऐवजी बारसू येथे उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाणार येथे भूसंपादन झाले असल्याने आणि प्रकल्पासाठी हीच जागा सुयोग्य असल्याने तिथे प्रकल्प उभारण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजत आहे.

First published:

Tags: Marathi news