मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीत शिंदे गटाकडून झाली चूक, लोकसभा सचिवालयाने पत्र परत पाठवले, खासदारांचे बंड झाले फेल?

दिल्लीत शिंदे गटाकडून झाली चूक, लोकसभा सचिवालयाने पत्र परत पाठवले, खासदारांचे बंड झाले फेल?

बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी

बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी

बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी

नवी दिल्ली, 19 जुलै : आमदारांना फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा सुरुंग लावला. 12 खासदार फोडून नवा गट स्थापन करण्याची हालचाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पण, एकनाथ शिंदे गटाकडून पाठवलेले लोकसभा सचिवालयाला पत्र चुकले आहे. सचिवालयाने पत्रात दुरस्त करून परत पाठवण्याचा सल्ला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री 12 वाजता शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. दिल्लीत जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडकोर खासदारांनी राजधानीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये बैठक घेतली. या बैठकीमध्ये खासदार गटाचे गटनेते निवडण्याची तयारी झाली.

बंडखोर खासदारांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने लोकसभा सचिवालयाला पत्रही पाठवले. पण या पत्रात लोकसभा सचिवालयाने काही बदल सुचवले. मुख्य प्रतोद यांच्या नावानेच पत्र द्या असं शिंदे गटाला सांगण्यात आलं आहे. त्यामुळे लवकर पत्र मिळेल अशी आशा कमी झाली आहे.

('कूल नवरा ज्याला....'; शिवानी रांगोळेनं शेअर केली खास पोस्ट, पाहा PHOTO)

यावेळी राहुल शेवाळे यांच्या नेतृत्वातील 12 खासदारांच्या गटाला मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. लोकसभेच्या शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी राहुल शेवाळे आणि प्रतोद पदी भावना गवळी यांची नियुक्ती केल्याचे पत्र देण्यात आले. भावना गवळी या शिंदे गटाच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम असल्याचं म्हटलं आहे. पण शिवसेनेनं आधीच भावना गवळी यांची हकालपट्टी केली आहे.

(बाहेरचे देश भारतात ढगफुटी घडवत असल्याचा तेलंगणाच्या CMचा दावा; हे खरंच शक्य आहे?)

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वतीने भावना गवळी यांच्या जागेवर राजन विचारे यांची पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करावी असे पत्र दिले होते. सुप्रीम कोर्टात सद्या शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुनावणी सुरू आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालय जो पर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत निर्णय घेणार नाही. आगामी पावसाळी अधिवशेनात शिवसेना मुख्य प्रतोद कोण असेल यावर अजूनही कुठलाही निर्णय झालेला नाही.

First published:
top videos