मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे : आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 44 विद्यार्थी जखमी

पुणे : आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 44 विद्यार्थी जखमी

यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते.

यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते.

यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 27 सप्टेंबर : पुण्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. मात्र, याचदरम्यान, ही बस दरीमध्ये गेली. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक वर्ग होता. सर्वांना बाहेर काढण्यात आलेले आहे. तर 4 मुले मंचर येथे पाठवण्यात आलेले आहे. बचाव कार्य करण्यात आलेले असून ॲम्बुलन्स द्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच व वैद्यकीय सुविधा देण्याचे कामकाज सुरू आहे

पुण्याचे जिल्हाधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आपत्कालीन सेवा आणि रुग्णालयांच्या संपर्कात आहोत. आम्ही आवश्यक ती सर्व मदत करत आहोत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच गटविकास अधिकारी घटनास्थळी आहेत. विद्यार्थ्यांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काल ठाण्यातही स्कूल बस उलटली -

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक खाजगी मिनी स्कूल बस काल सकाळच्या सुमारास उलटली. या बसमध्ये सुमारे 17 ते 18 विद्यार्थी होते. बस उलटल्यानंतर स्थानिकांनी बसमध्ये चढून विद्यार्थ्यांना तातडीने बाहेर काढले. या अपघातात दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. तर याप्रकरणी शाळा प्रशासनाने सांगितले की, ही स्कूल बस नसून खासगी बस आहे. या बसच्या माध्यमातून मुलांना शाळेत आणले जात होते. बस उलटल्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

हेही वाचा - पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी खरेदी केली भांडी, युवक काँग्रेसचा दारातच मांडला ठिय्या

ही घटना अंबरनाथच्या ग्रीन सिटी कॅम्पसमध्ये घडली. बसमध्ये अंबरनाथ रोटरी स्कूलचे विद्यार्थी होते. बस ग्रीन सिटी संकुलात आली असता बस चालकाने रिव्हरवुड बिल्डिंगसमोरील उतारावर बसला मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या घटनेनंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी बसमालकाविरोधात संताप व्यक्त केला.

First published:

Tags: Accident, Pune, School bus