मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी खरेदी केली भांडी, युवक काँग्रेसनं दारातच मांडला ठिय्या

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी खरेदी केली भांडी, युवक काँग्रेसनं दारातच मांडला ठिय्या

विद्यापीठाच्या पैशातून चक्क संसारपयोगी भांडी खरेदी केल्याने युवक काँग्रेसने त्यांना चक्क जुनी भांडी भेट देऊन निषेध केला

विद्यापीठाच्या पैशातून चक्क संसारपयोगी भांडी खरेदी केल्याने युवक काँग्रेसने त्यांना चक्क जुनी भांडी भेट देऊन निषेध केला

विद्यापीठाच्या पैशातून चक्क संसारपयोगी भांडी खरेदी केल्याने युवक काँग्रेसने त्यांना चक्क जुनी भांडी भेट देऊन निषेध केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 27 सप्टेंबर : शिक्षणाचं माहेर घरं असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरू कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या पैशातून चक्क संसारपयोगी भांडी खरेदी केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. कुलगुरूंच्या कार्यालयासमोरच आंदोलन करण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरू कारभारी काळे यांनी विद्यापीठाच्या पैशातून चक्क संसारपयोगी भांडी खरेदी केल्याने युवक काँग्रेसने त्यांना चक्क जुनी भांडी भेट देऊन निषेध केला. कुलगुरूंच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं आहे. कुलगुरूंच्या बंगल्यासाठी चक्क संसारपयोगी वस्तूंची खरेदी केल्या आहेत. कुक्कर, मिस्कर, डिनरसेट, पँन, बरणी, उशा, पडदे अशा तब्बल 92 संसारपयोगी वस्तूंची खरेदी केल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. याबद्दलची बिल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे.

कुलगुरू कारभारी काळे यांच्या संसारावर विद्यापीठाकडून दीड लाखांचा चुराडा करण्यात आला आहे. कुलगुरुंनी फक्त टॉयलेटचच भांडे घेण्याचं ठेवलंय. बाकी सगळा चार लाख रुपयांचा खर्च हा विद्यापीठाच्या पैशातून करुन नविन भांडयाचा सेट घेतला आहे, असा आरोपही आंदोलक कार्यकर्त्यांनी केला.

काळे यांना दोन महिने झाले आहे. आणि त्यांनी दोन आठवडा अमेरिका वारी केल्याचा आरोपही युवक काँग्रेसने केला आहे. कुलगुरू काळे यांना भेटण्यासाठी वेळ मागितला, पण मागील तीन महिन्यांपासून वेळ देत नाही, फोन उचलत नाही, असं म्हणत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज कुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केले आणि संसार उपयोगी भेट वस्तूच भेट दिल्या आहे.

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी निवेदनासोबतच भांडी ही गिप्ट केली. त्यावर चौकशी करून लेखी उत्तर देतो असं खुलासा कुलसचिवांनी केला आहे.

First published: