जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Rajya Sabha Election Result: "जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली" - शरद पवार

Rajya Sabha Election Result: "जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, फडणवीसांनी विविध मार्गांनी माणसं वळवली" - शरद पवार

"जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, फडणवीसांनी..." : राज्यसभा निवडणुकीनंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया

"जो चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, फडणवीसांनी..." : राज्यसभा निवडणुकीनंतर पवारांची पहिली प्रतिक्रिया

Rajya Sabha Election result: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेनेच्या संजय पवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 11 जून : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल (Rajya Sabha Election Result) रात्री उशीरा जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप **(BJP)**ने शिवसेनेला (Shiv Sena) धोबीपछाड दिला. या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या निवडणूक निकालावर शरद पवारांनी सविस्तर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (NCP Chief Sharad Pawar’s first reaction after Rajya Sabha Election result) धक्का बसेल असा निकाल नाही शरद पवार म्हणाले, मला स्वत:ला धक्का बसेल असा हा निकाल नाही. तुम्ही जर मतांची संख्या बघितली, प्रत्येक उमेदवाराची तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्या कोट्यात काहीच फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना जादा मिळालं आहे. हे मत कुणाचं आहे हे मला ठावूक आहे. हे मत आघाडीचं नाही तर दुसऱ्या बाजूचं आहे. वाचा :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘रात्रीस खेळ’; निकालाचा हायव्होल्टेज ड्रामा, मध्यरात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर आम्ही धाडस केलं आणि… शरद पवार पुढे म्हणाले, आता सहावी जागा जी शिवसेनेने लढवली. तिथे मतांची संख्या कमी होती. पण धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्या प्रयत्नात अपक्षांची संख्या ही भाजपकडे अधिक होती आमच्याकडे कमी होती. दोघांनाही पुरेशी अशी संख्या नव्हती. त्यामुळे भाजपने आम्हाला पाठिंबा देऊ इच्छिणारे जे अपक्ष होते त्यांना आपल्या बाजुला घेण्यासाठी जी काही यशस्वी कारवाई केली त्यात त्यांना यश आलं. त्यामुळे हा फरक पडला आहे. वाचा :  फडणवीसांची खेळी यशस्वी, अपक्षांची मतं फुटली; महाविकास आघाडीला धक्का चमत्कार मान्य केला पाहिजे… ही जी आघाडी आहे त्या आघाडीच्या एकंदरीत संख्येप्रमाणे मतदान झालं आहे. जो चमत्कार झालेला आहे तो मान्य केला पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांची माणसं आपलीशी करणं विविध मार्गाने, त्या मार्गाने त्यांना यश आलं. मतमोजणी बाबत झालेला उशीर म्हणजे भाजपचा रडीचा डाव असंही शरद पवार म्हणाले. वाचा :  धनंजय महाडिकांनी अखेर मैदान मारलं; वडिलांच्या विजयानंतर मुलगा भावूक शरद पवार पुढे म्हणाले, या निकालाचा सरकारच्या स्थिरतेवर काही परिणाम होणार नाही. तुम्ही कॅल्युलेशन पाहा ना… तुम्ही सर्व संख्या पाहिली तर सरकार चालवण्यासाठी जी संख्या आहे त्याच्यात काहीही धक्का नाही. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल यांच्या एकाही मताला धक्का बसलेला नाहीये. भाजपच्या एकाही मताला धक्का बसला नाही. आता राहिला अपक्षांचा प्रश्न… तर शेवटी ते झालं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात