मुंबई, 28 ऑगस्ट : शिंदे आणि ठाकरे गटातील तू तू मै मै काही जनतेसाठी नवीन राहिली नाही. अगदी पावसाळी अधिवेशनतील धक्काबुक्कीचा प्रसंग असो वा संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमातील कमी गर्दीमुळे झालेली टीका असो..वारंवार विविध कारणांवरुन दोन्ही गट एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसत आहे. त्यातही पावसाळी अधिवेशनात विरोधकांची दिलेल्या ‘50 खोके एकदम ओक्के’ या घोषणेवरुन शिंदे गटातील आमदाराकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावरून आता आमदार गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले गुलाबराव पाटील? मंत्री होणे आमच्या पंजोबांच्याही नशिबात नव्हते. मात्र आम्ही मंत्री झालो. लोकांना वाटतं पुढार्यांची मजा आहे. आणि त्यातच आता 50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ असं थेट चॅलेंज मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आमचा, शिंदे गटाने केला दावा, वाद पेटणार! शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबतच्या युतीवर काय म्हणाले गुलाबराव पाटील? ‘प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो तसाच प्रयत्न राज ठाकरे देखील करत आहेत. मात्र यामुळे कोणाचा नफा किंवा नुकसान होईल हे सांगता येत नाही. शेवटी कोणाचे डोके जास्त निवडून येतात यालाच महत्त्व असून आम्ही डोके निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, घोडा मैदान दूर नसून त्यासाठी सर्वच नेते आणि पक्ष प्रयत्न करत असून चार सहा महिन्यात होणाऱ्या नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल अशी प्रतिक्रियाही गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







