पुणे, 26 ऑक्टोबर : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी आमदार विनायक निम्हण यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री 9 वाजता पाषाण स्मशानभूमीमध्ये होईल. दरम्यान विनायक निम्हण यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. विनायक निम्हण यांना औंध जिव्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, हृदयविकाराच्या तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. 1999 साली ते आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते. 1999 ते 2014 पर्यंत एकूण 15 वर्षे शिवाजीनगर मधून आमदार होते. यातील पहिल्या दोन टर्म ते शिवसेनेचे आमदार होते आणि नंतरचे पाच वर्षे ते काँग्रेसचे आमदार होते. शिवसेना विभाग प्रमुख, आमदार, पुणे शहर प्रमुख अशा विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत काही शिवसेना नेते आणि कार्यकर्ते गेले होते, हेही वाचा - दादांसाठी राष्ट्रवादी पुन्हा आशावादी! ‘महाविकासआघाडी’मध्ये अजित पवार मुख्यमंत्री?
त्यांच्यात निम्हण यांचा समावेश होता. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करुन शिवबंधन बांधले होते. यावेळी त्यांची शिवसेनेच्या शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली होती. मृत्यूसमयी ते ६० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा माजी नगरसेवक सनी निम्हण, सून, नातवंडे असा परिवार आहे.

)







