पुणे, 17 ऑक्टोबर : दिवाळीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळी हा दिव्यांचा सण पूर्ण तेजोमय प्रकाशात भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. सर्वत्र दिव्यांच्या लायटिंगचा झगमगाट, फटाके, फराळ , नवनवीन कपडे ही दिवाळीची खासियत आहे. दिवाळीमध्ये घर सजावटीसाठी लाइटिंगची सगळ्यात जास्त क्रेझ असते आणि दरवर्षी आपल्या घराच्या सजावटीसाठी नवनवीन लायटिंग असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. याच लायटिंगची बजेट फ्रेंडली शॉपिंग पुण्यात कशी करायची जाणून घेऊया. या प्रकारच्या लाइटिंग खरेदी करू शकता पुण्यातील रविवार पेठ येथील बोहरी आळीमध्ये अनेक लाइटिंगची दुकाने आहेत. इथे सध्या अनब्रेकेबल लाइटिंग, फुलपाखराच्या आकाराच्या लाईटींग, फुलांच्या आकाराच्या लायटिंग तसेच छोट्या कंदीलांच्या आकाराच्या लायटिंग सध्या बाजारामध्ये आलेल्या आहेत. या लायटिंग स्वस्त असून तुम्ही दीडशे रुपयांपासून लाइटिंगची सुंदर अशी आकर्षक माळ खरेदी करू शकतात. हेही वाचा : Diwali 2022 : फक्त 50 रुपयांत इथे मिळतोय आकाशकंदील, विश्वास बसत नाही पाहा VIDEO तसेच तुम्हाला छोटी लायटिंग खरेदी करायची असेल तर 70 रुपयांपासून खरेदी करू शकतात. इथे दुकानांमध्ये सध्या अनब्रेकेबल लाइटिंगचा नवीन प्रकार आहे. यामध्ये लायटिंग 250 रुपयांमध्ये 14 फूट असून ही लाइटिंग पडल्यानंतर फुटत नाही. तसेच याच्यामध्ये मल्टी कलर किंवा साधा लाईट देखील उपलब्ध आहेत. यामध्ये मोती लायटिंग सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. दिवाळीच्या दरम्यान आमच्याकडे मोठ्या प्रमाणात लाइटिंग खरेदी होते. यामुळे मार्केटमध्ये आम्ही सध्या इंडिया मेड आणि चायना मेड अशा दोन्ही पद्धतीच्या लायटिंग ठेवत आहोत. यामध्ये अनब्रेकेबल लायटिंग सध्या सगळ्यात जास्त मागणी आहे. ह्याच्यामध्ये 14 फुटापासून ते 100 फुटापर्यंतची लायटिंग उपलब्ध असून ग्राहकांचा सगळ्यात चांगला प्रतिसाद ह्या लायटिंगला मिळत आहे. हेही वाचा : Diwali 2022 : मुंबईतील चिवडा बाजारात काय आहे मस्त? पाहा VIDEO फुलांच्या लाइटिंग ज्याच्यामध्ये काचेची फुले आहेत. फुलपाखरांच्या लायटिंग, छोट्या कंदीलाच्या लायटिंग अशी विविध प्रकारच्या लाइटिंग सध्या उपलब्ध असून ग्राहक मोठ्या प्रमाणात लायटिंग खरेदी करत आहेत. एवढेच नाही तर ह्या सर्वांची किंमत अत्यंत अल्प आहे. होलसेल मार्केट असल्यामुळे इथे 70 रुपयांपासून पासून लाइटिंग सुरू होतात ते 500 रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे लायटिंग मिळू शकतात, असं मेम साब या दुकानाचे मालक जगदीश यादव यांनी सांगितले. सध्या मार्केटमध्ये खूप छान छान लायटिंग आहेत. या वेगववेगळ्या डिझाईन बघून आम्हाला स्वतःला कन्फ्युजन होत आहे की, नक्की कोणती लाइटिंग घ्यावी. यासाठी आम्ही लायटिंगचे फोटोज काढून घरी देखील पाठवत आहोत. यामुळे मार्केटमध्ये सध्याला खूप छान अशा लायटिंग आम्हाला उपलब्ध झालेले आहेत, असं ग्राहक कुमार गाला यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.