मुंबई, 15 ऑक्टोबर : प्रकाश आणि मांगल्याचा दीपोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या या आनंद उत्सवात घरात विविध प्रकारचे चविष्ट फराळ खाल्ले जातात. यातील काही पदार्थांची रेसिपी अगदी किचकट असते. अशी रेसिपी घरी बनवण्याचा प्रयत्न केला असता महागड्या वस्तू खराब होण्याची शकता नाकारता येत नाही. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही मुंबईच्या लालबाग येथील चिवडा गल्लीत दिवाळीसाठी लागणारे सर्व प्रकारचे फराळ उपलब्ध झाले आहेत. कोणते पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत? करंजी, लाडू, मिठाई, चकली,गोड शंकरपाळी, तिखट शंकरपाळी,भाजकी पोह्याचा चिवडा, नायलॉन चिवडा, जाड पोह्यांचा चिवडा, लसूण चिवडा, मिक्स चिवडा, नायलॉन शेव, गाठीया, तिखट शेव, लसूण शेव, गोल कचोरी, पास्ता क्रॅकर्स, साबुदाणा चिवडा, बेसन लाडू, इत्यादी पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत. हेही वाचा : Diwali 2022 : फक्त 50 रुपयांत इथे मिळतोय आकाशकंदील, विश्वास बसत नाही पाहा VIDEO काय भावाने हे पदार्थ विकले जात आहेत? या वर्षी महागातला महाग पदार्थ हा भाजणीची चकली आहे. तर स्वस्तातला स्वस्त पदार्थ म्हणजे शंकरपाळी आहेत. चिवडा 200 ते 300 रुपये प्रति किलोच्या आत विकला जातोय. तसेच करंजी डझनच्या भावाने वेगवेगळी विकली जात आहे. सगळे ताजे पदार्थ विक्रीसाठी पूर्वी सारखं फराळ घेण्यासाठी स्पेशल चिवडा गल्लीत येणारे ग्राहक खूप कमी आहेत. चिवडा गल्लीत फराळ खरेदी करण्यासाठी जास्त प्रमाणात जुने लोकच येतात. त्यामुळे आम्ही जास्त प्रमाणात स्टॉक करून ठेवत नाही. सगळे ताजे पदार्थ आम्ही विक्रीसाठी ठेवतो, असं विजयलक्ष्मी फराळ दुकानाचे मालक शंकर काळे यांनी सांगितले. हेही वाचा : फिरत्या चाकावरती मातीला आकार, दिवाळीसाठी घ्या आकर्षक पणत्या! पाहा Video महागाईचा फटका दिवाळीच्या फराळाला सुद्धा इंधन दर तसेच अनेक कच्चे पदार्थ दर वाढल्यामुळे यावर्षी दिवाळीच्या फराळाचे दर, मसाल्यांचे दर सुद्धा वाढले आहेत. फराळ विकत घेताना किंवा घरी आणल्यावर डब्ब्यात ठेवताना घ्या काळजी फराळ विकत आणताना तो वर्तमानपत्रात बांधून आणू नका. तसेच घरी डब्ब्यात ठेवताना सुद्धा तो वर्तमानपत्रात ठेवू नका कारण मासिकं आणि वर्तमानपत्रातील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईतील ग्राफाईट हा घटक असल्यामुळे त्यापासून कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. म्हणून फराळ प्लेन पेपर किंवा डिशमध्ये घेऊन खा आणि स्वस्त राहा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.