नाशिक 13 ऑक्टोंबर : प्रकाश आणि मांगल्याचा
दिवाळी
सण काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर
नाशिक
शहरातील सर्वच बाजारपेठा गजबजल्या आहेत. घर सजावटीच्या विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यात आकाशकंदील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जवळपास 20 ते 25 प्रकारचे आकाशकंदील यंदा बाजारात विक्रीसाठी आले आहेत. या आकाशकंदीलला ग्राहकांची जास्त पसंती यंदा आकर्षक आणि हटके आकाशकंदीलला ग्राहकांची जास्त मागणी आहे. त्यातील राजवाडा, स्टार, पारंपारिक, वेलवेट, वूडण, फ्रेम, मयुर , कमळ, हंडी, शंकरपाळी, डायमंड, कडक, झुट, आकादीप, करंजी हे आकाशकंदील ग्राहक जास्त घेत आहेत. अगदी 50 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत आकाशकंदीलच्या किंमती असून ग्राहकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. हेही वाचा :
ऑनलाइन खरेदी टाळा, आम्हाला संधी द्या, ‘या’ गावातील दुकानदारांची मोहीम, Video
चायनीज पेक्षा स्वदेश आकाशकंदील घेण्याकडे ग्राहकांचा भर दरवर्षी चायनीज वस्तूंवर बहिष्कार टाकला जातो. काही काळासाठी खरेदी बंद होते परंतु परत चायनीज वस्तू खरेदी केल्या जातात. मात्र, यंदा आकाशकंदील स्वदेशी घेण्याकडे ग्राहकांचा जास्त भर आहे. विविध कापडांपांसून अतिशय सुंदर विणकाम करून आकाशकंदील बनवले गेले आहेत. आकर्षक आणि सुबक आहेत. कोरोना नंतर पहिल्यांदाच इतका मोठा सण निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यामुळे साहजिकच सर्वांमध्ये उत्साह भरला आहे. बाजारपेठा देखील चांगल्या गजबजल्या आहेत. कारण दोन वर्षे अगदी शांततेत गेली. यावेळेस ग्राहकांचा खरेदी करण्यासाठी चांगला प्रतिसाद आहे. आकाशकंदीलला मागणी चांगली आहे. त्यात चायनीज पेक्षा जे स्वदेशी आकाशकंदील आहेत त्यांना मागणी जास्त आहे, अशी माहिती दुकानदार धीरज सोनवणे यांनी दिली आहे. हेही वाचा :
हातगाड्यावर सुरूवात झालेला ‘लक्ष्मीनारायण चिवडा’ कसा बनला जागतिक ब्रँड? पाहा Video या ठिकाणी मिळतात विविध प्रकारचे आकाशकंदील नाशिक शहरातील कानडे मारुती लेण ही मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी सर्व आकाशकंदीलची जास्त दुकान आहेत. स्वस्त आणि छान आकाशकंदील इथे मिळतात.
गुगल मॅपवरून साभार