पुणे, 24 ऑक्टोबर : दिवाळी सणाच्या दिवशी सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. लक्ष्मीपूजनानंतर आसमंत उजाळून निघाले होते. फटाके फोडून सर्वांनी आनंद साजरा केला. पण, पुण्यास राज्यभरात ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहे. एकट्या पुण्यात आग लागल्याच्या 17 घटना समोर आल्या आहेत. दिव्यांच्या प्रकाशाने आसमंत काल उजाळून निघाले होते. पु्ण्यात मोठ्या जल्लोषात दिवाळी सण साजरा झाला. तरुण आणि आबाल वृ्द्धांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला. पण, फटाके फोडण्याच्या नादात आग लागल्याच्या घटना घडल्या आहे. एकट्या पुण्यात आग लागल्याच्या 17 घटना समोर आल्या आहेत. अग्निशमन दलाला वेगवेगळ्या भागातून आग लागल्याबद्दल 17 ठिकाणाहून माहिती आली. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कुठेही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. (Video : चक्क सोन्याची आहे ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!) पुण्यातील औंधमधील डिपी रोड येथे एका इमारतीलामध्ये पहिल्या मजल्यावर फटाक्यामुळे मोठी आग लागली होती. पुणे व पीएमआरडीए एकूण ७ फायरगाड्या, २ वॉटर टँकर व शासकीय २ आणि अग्निशमनची १ रुग्णवाहिका दाखल होऊन आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी नाही. (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची ‘लक्ष्मी’ सोडून गेली, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृ्त्यू) तर यवतमाळमध्ये फटाक्यांमुळे तीन दुकाने जळून खाक झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव शहरातील क्रांती चौकात रात्री ही घटना घडली. फटाक्यांमुळे आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. पण या आगीमध्ये किराणा शॉप, विमा कार्यालय आणि अन्य दुकान असे 3 दुकान जळून खाक झाली. फटाक्याच्या ठिणगीने गोदामाला लागली आग तर, विरार पूर्वेच्या गोपचरपाडा येथील एका इमारतीच्या तळ मजल्यावरील गोदामाला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. या परिसरात तरुणांकडून दिवाळीचे फटाके फोडले जातं होते. तेव्हा फटाक्याची ठिणगी या बंद गोदामात पोहोचली आणि गोदामाला भीषण आग लागली. धुराचे मोठं मोठे लोळ बिल्डिंगमध्ये पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यामुळे या संपूर्ण बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी बिल्डिंग बाहेर धाव घेतली. वसई पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले आहे. या घटनेत गोदामातील संपूर्ण कपड्याचा माल जळून खाक झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.