जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : चक्क सोन्याची आहे 'गोल्डन रॉयल प्लाझा' मिठाई, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!

Video : चक्क सोन्याची आहे 'गोल्डन रॉयल प्लाझा' मिठाई, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!

Video : चक्क सोन्याची आहे 'गोल्डन रॉयल प्लाझा' मिठाई, पाहताच सुटेल तोंडाला पाणी!

24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई 4 हजार रुपये किलोने विक्री होत आहे. सध्या ही मिठाई आकर्षणाचा विषय ठरत आहे.

  • -MIN READ Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

    अहमदनगर, 24 ऑक्टोबर : दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जवळच्या माणसांना मिठाई देण्याची परंपरा आहे. तसेच पूजेसाठी देखील प्रसाद म्हणून हमखास मिठाई लागतेच. यात सोन्याची मिठाई असेल तर बातच न्यारी. अशी मिठाई फक्त मोठ्या शहरांमध्ये यापूर्वी उपलब्ध होती. मात्र, यंदा दिवाळीच्या पर्वावर सोन्याच्या वर्खाने मढवलेली मिठाई ‘अन्नपूर्णा फुड्स’ने अहमदनगरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली ही ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई 4 हजार रुपये किलोने विक्री होत आहे. सध्या ही मिठाई आकर्षणाचा विषय ठरत आहे.   मिठाई घेण्यासाठी, पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. स्वस्त आणि चवीला मस्त असणाऱ्या ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाईचा लहान एक बॉक्स 1200 रुपयांना विक्रीसाठी आहे. दिवाळीनिमित्त भेट म्हणून देण्यासाठी सोन्याच्या मिठाईला प्राधान्य दिले जाते. या मिठाईला महाराष्ट्रात विशेष पसंती मिळते. राजस्थानी कारागिरांनी  बनवली मिठाई सोन्याचा भावात चढउतार झाला तरी मिठाईच्या किमतीत कोणतेही बदल केले जाणार नाहीत. सोन्याचा वर्ख हा भारत सरकारच्या विशिष्ट प्राधिकरणाकडून मान्यताप्राप्त आहे. सोन्याच्या मिठाईमध्ये रोस्ट केलेले ड्रायफ्रुटस, काजूचा बेस, मामरा बदाम, काजू, पिसोरी पिस्ता, शुद्ध केशर, साजूक तूप, ग्लूकोजचा समावेश आहे. राजस्थानी कारागिरांनी ही मिठाई बनवलेली आहे. सोन्याचा अर्क मोठ्यांना देखील आरोग्यदायी असतो.  विशेषतः ग्लूकोज वापरून ही मिठाई बनवण्यात आली आहे. Video : शेतकऱ्यांची दिवाळी गोड नाहीच, कवडीमोल भावानं फुलांची विक्री! विदेशातही विक्री मिठाईसह अन्नपूर्णा फुड्समध्ये विविध प्रकारच्या मिठाई करंजी, अनारसे, चकली, शंकरपाळे, शेव, चिवडा देखील येथे उपलब्ध आहे. या ठिकाणी खरेदी केलेले हे फराळ अमेरिका, इंग्लंड यासारख्या देशातही पाठवले जातात, अशी माहिती अन्नपूर्णा फुड्सचे संचालक गुगळे बंधू यांनी दिली. 

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात