जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची 'लक्ष्मी' सोडून गेली, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृ्त्यू

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरची 'लक्ष्मी' सोडून गेली, पतीच्या डोळ्यादेखत पत्नीचा मृ्त्यू

 साळवे दाम्पत्य हे मोटारसायकलवरुन दिवाळी सणाची खरेदी करुन घरी लाखेगाव इथं घरी परत येत होते

साळवे दाम्पत्य हे मोटारसायकलवरुन दिवाळी सणाची खरेदी करुन घरी लाखेगाव इथं घरी परत येत होते

साळवे दाम्पत्य हे मोटारसायकलवरुन दिवाळी सणाची खरेदी करुन घरी लाखेगाव इथं घरी परत येत होते

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी पैठण, 24 ऑक्टोबर : सर्वत्र दिवाळी चं उत्साही वातावरण आहे. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे खरेदीसाठी लगबग सुरू आहे. पण, औरंगाबाद शहरात दिवाळीच्या दिवशी खरेदी करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. खरेदी करून घरी जात असताना भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला धडक दिला. या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाली आहे. या घटनेमुळे ऐन दिवाळी सणाच्या वेळी लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील बिडकिन येथील डी.एम.आय.सी.जवळ आज सकाळी हा अपघात घडला आहे. मोटारसायकल आणि आयशर टेम्पोचा अपघात झाला होता‌. लाखेगाव इथं राहणारे साळवे दाम्पत्य आपल्या दुचाकीवरून दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात केले होते. बाजारात खरेदी केल्यानंतर दोघे घरी परत येत होते. (दिवाळीसाठी घरी जात असतानाच कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा जागीच मृत्यू) साळवे दाम्पत्य हे मोटारसायकलवरुन दिवाळी सणाची खरेदी करुन घरी लाखेगाव इथं घरी परत येत होते. असताना बिडकीनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील वंदना राजू साळवे या जागीच ठार झाल्या. तर राजू बन्सी साळवे हे गंभीर जखमी झाले आहे. (  मध्य प्रदेशमध्ये बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 14 जणांचा मृत्यू ) राजू साळवे यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने लाखेगाव गावावर शोककळा पसरली आहे. साळवे कुंटुबावर ऐन दिवाळी सणावर शोककळा पसरली आहे. ‌ कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा जागीच मृत्यू दरम्यान, उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. भरधाव वेगात असलेली कार कंटेनरवर आदळल्याने कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृत व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सर्वांना बाहेर काढलं आणि रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी पाचही जणांना मृत घोषित केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात