मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कुटुंबासह भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा, पाहा VIDEO

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कुटुंबासह भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा, पाहा VIDEO

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कुटुंबासह भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कुटुंबासह भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची पूजा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.

पुणे, 20 ऑगस्ट : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून ते प्रचंड व्यस्त आहेत. सर्वसामान्यांसाठी ते ठिकठिकाणी प्रत्यक्ष जावून महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. पूरग्रस्त भागाची पाहणी असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल किंवा दहीहंडीच्या उत्साहात सहभागी होणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे ते प्रत्यक्ष सर्वसामान्यांमध्ये जावून जनतेच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल वेगळा आदर निर्माण होताना दिसत आहे. मुख्यमंत्री शुक्रवारी दिवसभर दहीहंडीच्या विविध ठिकाणच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहीले. त्यानंतर आज ते कुटुंबासह भीमाशंकर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी दाखल झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या कुटुंबियांसोबत श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या पूजा करताचे क्षण कॅमेऱ्यात टीपले गेले आहेत. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

(एका मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराचे वागणे बदलले अन् विवाहित प्रेयसीची आत्महत्या)

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,उपविभागीय अधिकारी सारंग कोडीलकर, कार्यकारी विश्वस्त तथा तहसिलदार वैशाली वाघमारे, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ऍड. सुरेश कौदरे, कार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, संतोष गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथील महादेवाचे आज सायंकाळी 8 वाजता सहकुटुंब  दर्शन घेतले व अभिषेख करून आरती केली. श्रावण महिण्यात भीमाशंकरला दर्शनासाठी उपस्थित राहनारे शिंदे हे एकमेव मुख्यमंत्री आहेत. राज्यातला बळीराजा सुखी होऊ दे. सर्वांना सुखी दिवस येऊन राज्यातल्या नागरिकांच्या आयुष्यात परिवर्तन होऊन समाधानी लाभु दे, असे आशीर्वाद राज्यातल्या जनतेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मागितले.

First published:

Tags: Eknath Shinde, Pune