मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एका मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराचे वागणे बदलले अन् विवाहित प्रेयसीची आत्महत्या

एका मुलाच्या आईचे विवाहबाह्य संबंध, प्रियकराचे वागणे बदलले अन् विवाहित प्रेयसीची आत्महत्या

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

सोमा बेरा नावाच्या महिलेचा विवाह पश्चिम मिदनीपूरच्या दासपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालपूर गावातील रहिवासी झंटू पात्रासोबत झाला होता.

पूर्वी मेदिनीपुर, 20 ऑगस्ट : देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सातत्याने आत्महत्येच्या घटना समोर येत आहेत. पश्चिम बंगालमधील पूर्वी मेदिनीपुर जिल्ह्यात एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. मात्र, तिच्या प्रियकराने तिच्यासोबत वागणे बदलले होते. प्रियकराचे वागणे बदलल्यामुळे तिला हे सहन न झाल्याने या महिलेने आत्महत्या केली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना पश्चिम बंगालच्या पूर्वी मेदिनीपूर जिल्ह्यातील गुरुग्राम परिसरातील आहे. या ठिकाणी एका महिलेचे विवाहबाह्य संबंध होते. प्रियकरासोबत तिचे संबंध सुरू होते. मात्र, अचानक तिच्या प्रियकराचे वागणे बदलले. हे तिला सहन न झाले नाही. याच तणावातून या विवाहित महिला प्रेयसीने आत्महत्येचा निर्णय घेतला. तिने आपल्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करत आत्महत्या केली. दरम्यान, या घटनेनंतर तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयी कोठडी सुनावण्यात आली आहे.

अनिमेश गुचैत असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. घटना घडल्यानंतर तो फरार होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर शुक्रवारी आरोपीला अटक करून कांठी उपविभागीय न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्यांचा जामीन फेटाळला आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास भगवानपूर पोलीस करत आहेत. दोन्ही कुटुंबीयांनी विवाहबाह्य संबंध मान्य केले आहेत.

असे सुरू झाले प्रेमप्रकरण -

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमा बेरा नावाच्या महिलेचा विवाह पश्चिम मिदनीपूरच्या दासपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गोपालपूर गावातील रहिवासी झंटू पात्रासोबत झाला होता. दोघांचे आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. अनिमेष आणि सोमा यांना एक मूलही आहे. दोघांनीही एकमेकांच्या मर्जीने लग्न केले होते. भगवानपूर गुरुग्राम परिसरात त्यांचे सोन्याचे दुकान आहे. झुंटू आणि सोमा तिथे भाड्याच्या घरात राहायला आले होते. अनिमेष गुचैत त्यांच्या दुकानात जायचा. तो सोमाशी संवाद साधायचा. हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना दिसले.

हेही वाचा - सोशल मीडियावर मैत्री, Love Marriage च्या 3 महिन्यानंतर पत्नीचं मोठं कांड, पती हैराण

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर दोन्ही कुटुंबात वाद झाला. मध्यस्थी बैठकही झाली. तरीही दोघांमध्ये संपर्क कायम होता, मात्र, काही दिवसांपूर्वी प्रेयसीसोबत भांडण सुरू झाले. अनिमेषने व्हॉट्सअॅपवरून सोमाला व्हिडिओ कॉल केला. प्रियकर फोनच्या दुसऱ्या बाजूला असताना विवाहित प्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कंठी उपविभागीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी मृताचे पती झंटू पात्रा यांनी भगवानपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Suicide news, West bengal, Women extramarital affair