पुणे, 06 डिसेंबर: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाची भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण हत्या (Brutal murder by gun firing) करण्यात आली आहे. दुचाकीवरून अचानक आलेल्या मारेकऱ्यांनी व्यावसायिकावर तब्बल सहा गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे संबंधित तरुण घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेत संबंधित व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तापस केला आहे.
समीर मनूर शेख (Samir sheikh murder) असं हत्या झालेल्य तरुणाचं नाव आहे. हा हल्ला सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. प्रचंड वर्दळ असणाऱ्या रस्त्यावर चंद्रभागा चौकात मारेकऱ्यांनी तब्बल 6 गोळ्या घालून त्यांचा खून केला आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित हत्या आर्थिक कारणातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हेही वाचा-27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक बलात्कार; 2 दिवस हॉटेलमध्ये सुरू होता भयावह प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम व्यावसायिक समीर मनूर शेख याने आरोपी मेहबूब बलुर्गी या आपल्या मित्राकडून 5 लाख रुपये उसने घेतले होते. मृत समीर याने यातील अडीच लाख रुपये मेहबूबला परत दिले. पण उरलेले पैसे देण्यासाठी मात्र समीर टाळाटाळ करू लागला. विशेष म्हणजे मृत समीर अंगावर भरपूर सोनं घालून परिसरात 'गोल्डमन' बनून फिरतो. पण आपले अडीच लाख रुपये देत नाही.
हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य
यामुळे मेहबूबचा समीरवर राग होता. यातूनच संतापलेल्या मेहबूब याने दोन महिन्यांपूर्वी समीरची गळ्यातील सोन्याची चैन ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे दोघांमधील वाद विकोपाला गेला. यातूनच मेहबूब याने समीरचा पाठलाग करून त्याला भयंकर मृत्यू दिला आहे. आरोपीनं समीरला पाठीमागून पकडून जवळून 6 गोळ्या घालल्या आहेत. भरदिवसा गोळ्या घालून व्यावसायिकाची हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहबूबला ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder, Pune