मुंबई, 06 डिसेंबर: मुंबईतील (Mumbai) मुंब्रा परिसरात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका तरुणानं आपल्या सात वर्षीय मुलीची निर्घृण हत्या (Minor daughter brutal murder by father) केली आहे. नराधम आरोपीनं पत्नीसोबत झालेल्या वादाचा (Hassle with wife) राग चिमुकलीवर काढला आहे. आरोपीनं पोटच्या लेकीला पळवून नेऊन तिची गळा दाबून हत्या केली आहे. यानंतर नराधम बापाने देखील विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (attempt to commits suicide by drinking poison) केला आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात बापाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. माहिरा अनिस खान असं हत्या झालेल्या 7 वर्षीय चिमुकलीचं नाव आहेत. तर अनिस मालदार खान असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी वडिलांचं नाव आहे. आरोपी अनिस हा मुंब्रा येथील संतोषनगर परिसरात पत्नी आणि मृत मुलगी माहिरासोबत वास्तव्याला होता. शुक्रवारी रात्री सोनोग्राफी करण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणातून आरोपी अनिसचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला होता. हा वाद वाढत गेल्याने पत्नी आपल्या 7 वर्षीय मुलीला घेऊन शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांच्या घरी गेली. पण आरोपी दोघींचा पाठलाग करत नातेवाईकांच्या घरी पोहोचला. हेही वाचा- LLB अर्धवट सोडून सुरू केला भलताच उद्योग; 12 महिलांना जाळ्यात ओढणारा भामटा जेरबंद नातेवाईकांच्या घरी गेल्यानंतर देखील पती पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर अनिसने आपली सात वर्षीय मुलगी माहिरा हिला पळवून दत्तुवाडी येथील निर्जनस्थळी नेलं. याठिकाणी गेल्यानंतर आरोपीनं आपल्या पत्नीच्या मोबाईलवर फोन केला आणि ‘माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे’ असं सांगितलं. त्यानंतर आरोपीनं आपला फोन बंद करून ठेवला. अनिसची पत्नी त्याला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. पण त्याचा फोन बंद लागत होता. हेही वाचा- पतीने केलेला अपमान लागला जिव्हारी; विवाहितेनं खाल्ल्या ‘थायरॉईड’च्या 50 गोळ्या शनिवारी पहाटे अनिसने आपला फोन पुन्हा सुरू केला आणि माहिराची हत्या केल्याची माहिती पत्नीला दिली. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी वडील अनिसला ताब्यात घेतलं. पण अनिस याने आधीच विष प्राशन केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी तातडीने अनिसला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. आरोपीची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







