कोची, 06 डिसेंबर: गेल्या काही दिवसांपासून देशात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. देशाच्या विविध कोपऱ्यातून दररोज अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. यानंतर आता एका 27 वर्षीय मॉडेलवर सामूहिक अत्याचार (Gang Rape On Model) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी गुंगीचं औषध देऊन पीडित मॉडेलवर दोन दिवस अत्याचार केला आहे. आरोपींच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर, पीडित तरुणीनं स्वत: पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे.
बलात्कार पीडित मॉडेलच्या तक्रारीवरून पोलिसांनी 3 संशयित आरोपींविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. सर्व आरोपी पीडित मॉडेलच्या ओळखीचे असून पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या (1 accused arrested) आहेत. अन्य दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे. संबंधित घटना केरळ राज्यातील कोची याठिकाणी घडली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा-मुंबई हादरली! फोन करून पत्नीला ऐकवला शेवटचा आवाज मग लेकीसोबत केलं राक्षसी कृत्य
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मॉडेल ही केरळच्या मलप्पुरम येथील रहिवासी आहे. तर संबंधित सर्व आरोपी पीडितेच्या ओळखीचे आहेत. आरोपींच्या बोलावण्यावरून ती कोची याठिकाणी गेली होती. ककनाडच्या एदाचिरा येथील हॉटेलमध्ये गेल्यानंतर, आरोपींनी पीडितेच्या नकळत तिच्या ड्रिंकमध्ये गुंगी येण्याचं औषध टाकलं होतं. पीडितेला गुंगी आल्यानंतर आरोपींनी आळीपाळीने पीडितेवर सामूहिक अत्याचार केला आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी अनेक अश्लील व्हिडीओ देखील शूट केले आहेत.
हेही वाचा-लाजिरवाणी घटना, ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार
संबंधित व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीनं 1 आणि 2 डिसेंबर रोजी हॉटेलमध्येच पीडितेवर अत्याचार केला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मॉडेलनं पोलीस ठाण्यात जाऊन तिन्ही आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपी सालिन याला अटक केली आहे. तर शमीर आणि अजमल अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेची पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Gang Rape, Kerala